BJP MLA threats Bank Manager Saam Tv News
महाराष्ट्र

BJP MLA Crime: भाजप आमदाराकडून बँक मॅनेजरला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

BJP MLA threatens bank manager: जालना भाजप आमदार नारायण कुचे यांनी बँक मॅनेजरला फोनवर शिवीगाळ व धमकी दिल्याचा प्रकार उघड; ऑडिओ क्लिप व्हायरल, बँक संघटनेनं तक्रार दाखल केली.

Bhagyashree Kamble

जालन्यातील भाजपचे आमदार नारायण कुचे हे सध्या शेतकऱ्याचे कथित प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जामखेड येथील युनियन बँकेचे मॅनेजर ललित शिर्लेकर यांना फोनवरून शिवीगाळ करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तीन दिवसांपूर्वीची आहे. या घटनेनंतर बँक कर्मचारी संघटनेनं जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

नेमक प्रकरण काय?

जालना जिल्ह्यातील युनियन बँकेच्या शाखेत एका शेतकऱ्याचं कर्ज थकीत झाल्यामुळे त्यांचं एफडी खातं गोठवण्यात आलं. या प्रकरणाची माहिती भाजप आमदार नारायण कुचे यांना मिळाली. त्यांनी तातडीने युनियन बँकेचे मॅनेजर ललित शिर्लेकर यांना फोन केला. तसेच संवादादरम्यान, त्यांनी काम करण्यासाठी दबाव टाकला.

संभाषणादरम्यान, 'तुम्हाला एवढी मस्ती असेल तर, नीट करायला देखील मी लय पक्का आहे. एवढा माज, एफडीवाल्याला त्रास, ग्राहक सेवा द्यायला त्रास आहे का तुमचा. मी चांगल्या भाषेत तुम्हाला समजावून सांगितलंय, नाही समजलं तर आल्यावर हाताने समजावून सांगतो', अशा शब्दांत त्यांनी थेट धमकी दिली.

ऑडिओ क्लिपमधील संभाषण

आमदार कुचे- मॅनेजर साहेब आवाज येतोय का?

बँक मॅनेजर- नमस्कार साहेब.

आमदार कुचे- तुम्ही आमचं काय ऐकत नाही, माझ्या पद्दतीने बँकेत यावं लागतंय..

बँक मॅनेजर- साहेब, आमच्या हातात नाही ना, मी यासंदर्भात हेड ऑफिसला रिक्वेस्ट पाठवली आहे.

आमदार कुचे- एवढी मस्ती असलेला मॅनेजर मी आजपर्यंत पाहिलेला नाही.

बँक मॅनेजर- सर, थकीत असल्यामुळे, त्यांचं खातं गोठवलंय.

आमदार कुचे- तुम्हाला एवढी मस्ती असेल तर, नीट करायला देखील मी लय पक्का आहे. एवढा माज, एफडीवाल्याला त्रास, ग्राहक सेवा द्यायला त्रास आहे का तुमचा. जसं काय हे तुमच्या बापाचं आहे. आम्ही सरकारचे प्रतिनिधी आहोत. एवढा माज चढला आहे का तुम्हाला?

आमदार कुचे- तूला आतापर्यंत तीनदा समजावून सांगितलंय. ####दुसऱ्यांदा फोन करतोय तुला..

बँक मॅनेजर- सर, मी लेटर पाठवले आहे.

आमदार कुचे- काय पाठवलंय, नीट शिफारस कर की, रेकॉर्डींग करून घे, तुमत्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

बँक मॅनेजर- थकीत कर्ज असणाऱ्याचे हेड ऑफिस लॉक होत असतं. यासाठी अर्ज फॉरवर्ड केलेला आहे, सर..

आमदार कुचे- मी चांगल्या भाषेत तुम्हाला समजावून सांगितलं आहे, ऐकलं नाही तर आल्यावर सांगतो... तुमची इच्छा असेल तर..

बँक मॅनेजर- सर मी पाठवले आहे, हवं असल्यास तिथला पण नंबर देतो.

आमदार कुचे - रोहित धुळे म्हणून आहेत, त्याला ग्राहक सेवा केंद्र पाहिजे..तेवढं करून द्या..

बँक मॅनेजर- होहो सर..

या घटनेनंतर बँक कर्मचारी संघटनेने जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तोंडी तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे सरकारी अधिकाऱ्यांवर होणाऱ्या दबावाच्या प्रकारावरही प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Mumbai Ahmedabad Bullet Train: समुद्राखालून ३२० किमी वेगाने धावेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जाणून घ्य कसा असेल मार्ग

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT