अक्षय शिंदे, साम टीव्ही
भरधाव कार विहिरीत पडल्याची घटना जालन्यात घडली आहे. जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी- पारध रस्त्यावरील पद्मावती फाट्याजवळ घटना घडली आहे. या घटनेत दोन महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून दोघेजण जखमी आहे. जखमींवर बुलढाणा येथे उपचार सुरू आहे. दरम्यान विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे चार चाकी वाहन विहिरी बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला 12 तास अथक परिश्रम घ्यावे लागले. अखेर आज सकाळी विहिरीतून चार चाकी वाहन बाहेर काढण्यात आलं.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील भोकरदन तालुक्यात पारध ते वालसावंगी या मुख्य रोडवर भरधाव कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या 90 फूट विहिरीत कोसळली होती. या कारमध्ये 2 महिला आणि 2 पुरुष होते. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी तसेच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन पुरुषांना सुखरूप बाहेर काढले, तर 1 महिला गंभीर जखमी होती.
मात्र, तिला उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच तिचाही मृत्यू झाला, तर एक 75 वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृतदेह कारमध्येच अडकून पडला होता. या महिलेला आणि वाहनाला विहिरीच्या बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने रात्रभर प्रयत्न करत 12 तासाच्या प्रयत्नानंतर वाहनासह वृद्ध महिलेला बाहेर काढले आहे. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला असून त्यांची नावे सुलताना बेगम जीआउल्ला खान वय 45 वर्ष आणि अख्तरबी खान, वय 75 या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
या दोन्ही मृत महिला धावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथील रहिवासी असून मयत दोन्ही महिला सासू-सून असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, हे कुटुंब आपल्या एका नातेवाईकाच्या अवघडराव सावंगी येथील अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून त्यांच्या मूळ गावी धावडा येथून परतत होते. मात्र घरी जात असतानाच पारध-वालसावंगी मार्गावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या 90 फुट खोल विहिरीत कोसळली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.