

उल्हासनगर हिट अँड रनची घटना
भरधाव कारने दुचाकीला धडक दिली
चाकाखाली चिरडून वडिलांचा जागीच मृत्यू
अपघातामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला
उल्हासनगरमध्ये हिट-अँड-रनची घटना समोर आली आहे. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरून प्रवास करणारे बापलेक रस्त्यावर पडले. कारच्या चाकाखाली चिरडून वडिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली. कार चालक अविनाश मुथाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर क्रमांक १ येथील बिर्ला गेटसमोर ही घटना घडली. देवेंद्र सिंह राजपूत आणि त्यांचा मुलगा संजय सिंह राजपूत हे दुचाकीवरून शहाड स्टेशनच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर कारचालकाने काही अंतरावर वाहन थांबवलं. मात्र नागरिकांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने कार मागे घेत पुन्हा जखमी देवेंद्र सिंह राजपूत यांच्या अंगावरून कार चालवत घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे.
या भीषण घटनेत देवेंद्र सिंह राजपूत यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा संजय सिंह राजपूत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपी अविनाश मुथा हा कल्याणमधील नामांकित सोने व्यापारी असल्याची माहिती समोर आली आहे. उल्हासनगर पोलिसांनी त्याला अटक केली असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांनी तपासादरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी उल्हासनगर विभागाचे डीसीपी सचिन गोरे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असल्याचं सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.