jalna Ambad farmer died after a tractor  Saam Tv News
महाराष्ट्र

Jalna Accident : भरधाव ट्रॅक्टर थेट पाण्याच्या चारीत, पलटी होताच चालक खाली दबला; भीषण अपघातात जागीच मृत्यू

Jalna Accident : सध्या चारीमधून जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढला असून उत्तरीय तपाणसणीसाठी गोंदी येथील प्राथमिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Prashant Patil

जालना : जालन्यातील अंबड तालुक्यातील घुंघर्डे हादगाव शिवारामध्ये पाण्याच्या चारीमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुण शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अण्णासाहेब गव्हाणे असं मयत झालेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. घुंगर्डे हादगाव ते तीर्थपुरी रोडवरील पैठण डाव्या कालव्यातून येणाऱ्या २२ नंबर पाण्याच्या चारीमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन हा अपघात झाला.

सध्या चारीमधून जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढला असून उत्तरीय तपाणसणीसाठी गोंदी येथील प्राथमिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी अंबड येथे हलवण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

अकोल्यात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकच्या धडकेत रिक्षातील सर्व प्रवासी रस्त्यावर फेकले गेले असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर वाहतूक काही काळ खोळंबली होती.

अकोल्याच्या पातूरजवळ प्रवासी रिक्षा आणि ट्रकमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. पातुर- बाळापूर रस्त्यावरील बाबूळगाव जवळ हा भीषण अपघात झाला आहे. यात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने या अपघातात ऑटो रिक्षा मधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान यात रिक्षातील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

ट्रकची धडक इतकी भीषण होती की रिक्षा दूरवर जाऊन पलटी झाली. यात रिक्षातील सर्व प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. यात रिक्षातील प्रवासी पियुष रविंद्र चतरकर (वय १३, रा.सिंधी कॅम्प, अकोला) आणि लिलाबाई ढोरे (वय ५०, रा.लाखनवाडा) या दोघांचा मृत्यू झाला. तर सुरेंद्र चतरकर (वय ४५), रविंद्र चतरकर (वय ५२), रूपंचंद वाकोडे (वय ५०), प्रमिलाबाई वाकोडे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT