Jalna Accident News Saam TV
महाराष्ट्र

Jalna Accident News : भरधाव कार थेट जायकवाडीच्या कालव्यात कोसळली; आडत व्यापाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

Jalna Accident News : अंबड तालुक्यातील तीर्थपुरीजवळ जायकवाडीच्या डाव्या कालव्यात कार कोसळून आडत व्यापार्‍याच्या दुर्देवी मृत्यू झाला आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Jalna Accident News : जालना जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील तीर्थपुरीजवळ जायकवाडीच्या डाव्या कालव्यात कार कोसळून आडत व्यापार्‍याच्या दुर्देवी मृत्यू झाला आहे. नंदू सोनाजी राजगुरू असं मृत्युमुखी पडलेल्या आडत व्यापाऱ्यांचे नाव असून ते अंबड तालुक्यातील रुई गावचे रहिवाशी आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, तीर्थपुरी (Jalna News) येथील बाजार समितीच्या यार्डात कापूस व भुसार माल खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. आज ते रुई गावातून दुपारी १ वाजेच्या सुमारास भार्डी मार्गे तीर्थपुरीकडे येत होते. भार्डी गावाजवळ असलेल्या अचानकनगर या ठिकाणाहून वाहणाऱ्या जायकवाडीच्या डाव्या काळव्याजवळ त्यांचं कार वरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार डाव्या कालव्यात (Accident) जाऊन कोसळली.

या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना (Police) दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कार कालव्याच्या बाहेर काढली. मात्र, तोपर्यंत नंदू राजगुरू यांचा मृत्यु झाला होता. दरम्यान, नंदू राजगुरू यांच्या आडत दुकानात तीर्थपुरी व परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी शेकडो क्विंटल सोयाबीन आगाऊ जमा करून ठेवलेले आहेत.

जेव्हा भाव वाढेल त्यावेळेस सोयाबीनचे पैसे देण्याच्या अटीवर ही सोयाबीन नंदू यांनी शेतकऱ्याकडून खरेदी करून ठेवल्याची माहिती ही समोर येत आहे. त्यातच राजगुरू यांच्याकडे अनेक लोकांचे हातउसने पैसे ही असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राजगुरू यांच्याकडे लाखो रुपयांची देणी असल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हा अपघात की आत्महत्या अशा विविध चर्चाना परिसरात उधाण आलं आहे. (Breaking Marathi News)

गेल्यावर्षी झालं होतं नंदू राजगुरू यांचं अपहरण

दरम्यान नंदू राजगुरू हे गेल्या एक वर्षांपासून आर्थिक व्यवहारामुळे अडचणीत असल्याची माहिती ही समोर येत असून गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचं रुई गावातून अपहरण झाल्याची घटना ही घडली होती. याबाबत त्यांच्या पत्नीकडून गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला होता.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव

SCROLL FOR NEXT