Jalgaon BJP Saam tv
महाराष्ट्र

भाजपकडून हनुमान चालीसा पठण; राज्‍य सरकारचा केला निषेध

भाजपकडून हनुमान चालिसा पठण; राज्‍य सरकारचा केला निषेध

संजय महाजन

जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानात हनुमान चालिसा पठण करण्यास मज्जाव करून खासदार नवनीतकौर राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. याचा निषेध करत भाजप (BJP) महानगरच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजप कार्यालयात हनुमान चालिसा पठण करून राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध केला. (jalgoan news Hanuman Chalisa recitation from BJP Protest by state government)

जळगाव (Jalgaon) जिल्‍हा भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम झाला. यावेळी हनुमान चालिसा पठणास विरोध करणाऱ्या राज्य शासनाच्या विरोधात शहरातील भाजपच्या सर्व मंडलनिहाय हनुमान चालिसा पठण कार्यक्रम घेण्याच्या सूचना महानगराध्यक्ष यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या. राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून ‘जय श्रीराम, जय हनुमान'चा जयघोष करत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

तर भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून दाखवा

राणा दाम्पत्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला. तसेच हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांवर राज्य शासन कारवाई करणार असेल तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून दाखवावी; असे आव्हान भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! पुण्यातील जोडप्याकडून तीन वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण; ५ दिवसांनी चिमुकला सापडला पंजाबमधील वृद्धश्रमात

Maharashtra Live News Update: ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ रंगाचा अर्थ काय?

Banana Benefits: महिनाभर केळी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

SBI बँकेत सिनेस्टाईल दरोडा; 58 किलो सोनं आणि 8 कोटी कॅश लुटलं|VIDEO

SCROLL FOR NEXT