राणा प्रकरणातून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न

राणा प्रकरणातून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न
Anil Gote
Anil GoteSaam tv
Published On

धुळे : नवनीत राणा प्रकरणावरून धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नवनीत राणा प्रकरण हे सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा (BJP) प्रयत्न असल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. (dhule news BJP attempt to destabilize the government through Rana case)

Anil Gote
प्रेम संबंधाचा संशय; गाडीच्‍या डिक्‍कीत टाकून युवकाच्‍या अपहरणाचा प्रयत्‍न

राणा कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून बघितले तर महाराष्ट्रात दंगे घडवावे, राज्यात अशांतता निर्माण व्हावी आणि दोश महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारवर यावा; असा प्रयत्न भाजपतर्फे सुरू असल्याचा आरोप देखील गोटे यांनी भाजप वर लावला आहे. तसेच गोटे यांनी नवनीत राणा यांनी मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावरून घातलेल्या वादावर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीस यांनी कुठल्याही ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करण हे चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. परंतु नवनीत राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केल्यानंतर फडणवीसांनी त्यांना का थांबवले नाही? असा देखील प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस हे फार कपटी माणूस आहे. असे म्हणत (Anil Gote) गोटे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

भाजपनेच हे प्रकरण घडवून आणले

नवनीत राणा प्रकरणासंदर्भात गोटे यांनी भाजपची भूमिका ही "मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली" अशीच काहीशी असल्याच म्हणत या प्रकरणामध्ये भाजपने उघडउघड पाठिंबा न देता हे सर्व प्रकरण घडवून आल्याचा आरोप देखील गोटे यांनी भाजपवर लावला आहे.

भाजपचा हा कांगावेपणा

नवनीत राणा प्रकरण भाजपने व्यवस्थितपणे चिघळवले असल्याचा आरोप देखील गोटे यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी राणा दांपत्यास पूर्णपणे समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा मुंबई पोलिसांच्या जीवावर आली तेव्हा हे सर्व प्रकरण चिघळले असल्याचे म्हणत गोटे यांनी भाजपचा हा कांगावेपणा असून याला महाराष्ट्राची जनता विटली आहे, असं म्हणत भाजपवर टीका केली आहे. बीजेपी तर्फे आपल्या अधिपत्याखाली असलेल्या अधिकारांचा वापर करून विरोधकांना नामशेष करण्याचा प्रयत्न भाजपतर्फे सुरू असल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांच्यावर देखील गोटे यांनी चांगलाच निशाणा साधला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com