Fake Currency Saam tv
महाराष्ट्र

यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून 'तो' छापायचा नोटा, बसस्थानकात फिरत असतानाच नेमकं..

यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून 'तो' छापायचा नोटा, बसस्थानकात फिरत असतानाच नेमकं..

साम टिव्ही ब्युरो

पहूर (जळगाव) : यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून दोनशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा छपाईचे काम करत होता. गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून त्‍याचा हा धंदा सुरू होता. बऱ्याच नोटी देखील त्‍याने चलनात आणल्‍या आहेत. परंतु, बसस्‍थानकावर फिरत असताना असे काही झाले की त्‍याचा उलगडा झाला अन्‌ तरुणास पहूर पोलिसांनी (Police) अटक केली. (jalgoan news duplicate note to print after watching the video on You tube)

जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या हिंगणे बु. (ता. जामनेर) येथील उमेश चुडामण राजपूत (वय २२) या तरुणाने युट्युबवर व्हिडिओ पाहून मोबाईल आणि प्रिंटरच्या सहाय्याने दोनशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा (Fake Currency) छापून व्यवहारात आणण्याचा उद्योग सुरू केला. गेल्या सात-आठ महिन्यांपासून सुरू झालेल्या या त्याच्या उद्योगाविषयी त्याने कोणासही काही समजू दिले नाही. नोटा छापणे आणि मार्केटमध्ये व्यवहारात आणणे असाच जणू त्याने धडाका लावला होता.

पोलीसांच्या जाळ्यात

पहूर बसस्थानकावर दोनशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा व्यवहारात आणल्या जात असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून गस्तीवर असलेल्या (Jalgaon News) पोलिसांनी संशयास्पद अवस्थेत फिरत असलेल्या उमेश राजपूत यास विचारपूस केली. मात्र त्यांनी सुरुवातीला उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ दोनशे रुपयांच्या ३ नोटा आढळून आल्या. ३ पैकी १ नोट बनावट असल्याचे निष्पन्न होताच पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पथकासह हिंगणे बु. गाठून उमेश राजपूत त्याच्या घराची झडती घेतली. उमेश राजपूत याच्या घरात कॅनन कंपनीचे रंगीत प्रिन्टर, २०० रुपयांच्या ४६ बनावट नोटा, कोरे कागद, कटर असे नोटा छापण्यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य पोलीसांनी जप्त करून बनावट नोटांचा पर्दाफाश केला.

गुन्‍हा दाखल करत तपास सुरू

बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी आज पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भरत काकडे यांनी पहूर पोलिस ठाण्यात भेट देऊन जप्त केलेल्या नोटा आणि साहित्याची पाहणी करत या गुन्ह्यात दोषी असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. आरोपीने आतापर्यंत किती बनावट चलन व्यवहारात आणले आहे? या छपाईसाठी त्याला कोणाकोणाची व कशी मदत मिळाली? याविषयी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT