Bhusawal News
Bhusawal News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: यात्रेत चेंगराचेंगरी; बारागाड्यांखाली येऊन एकाचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : शहरातील सतारे भागातील ग्रामदैवत मरिमातेच्या यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (ता. २) सायंकाळी साडेसहाला बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमचा समारोप होत असताना बारा गाड्यांखाली चेंगरुन एक जण ठार तर सहा जण जखमी झाले. गुढीपाडव्याच्या आनंदात असताना ही दुर्घटना घडल्याने (Bhusawal) शहरात शोककळा पसरली. (jalgoan news bhusawal commotion on the journey One died under the barracks)

गुढीपाडव्यानिमित्त मरिमाता यात्रोत्सवाची शतकोत्तर वर्षांची परंपरा आहे. जळगाव (Jalgoan) रोडवरील जुना सतारे भागातील मरिमाता मंदिराजवळ बारागाड्या ओढल्या जातात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या (Corona) निर्बंधामुळे यात्रोत्सव भरविण्यात आला नव्हता. मात्र, यंदा कोरोनाचे निर्बंध हटविल्याने यात्रेत मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली. या गर्दीमुळे बारागाड्या ओढताना झालेल्या चेंगराचेंगरीत १ जण ठार (Death) तर सहा जण जखमी झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली.

उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

बारागाड्या धावत असताना काही लोक चाकाखाली दाबले गेले. यात कुणाच्या पोटावरून तर कुणाच्या हातापायांवरून गाड्यांचे चाके गेली. घटना घडताच जखमींना गाड्यांखालून काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गिरीष कोल्हे यांचा गोदावरी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. छोटू इंगळे (वय ३३), धर्मराज कोळी (वय ६३), मुकेश यशवंत पाटील (वय २८), नितीन फेगडे (वय ४०) दीपक कोळी यांसह आणखी एक जण जखमी झाला आहे. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Chiplun Heavy Rain : भर उन्हाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; चिपळून, अडरे भागात नद्या झाल्या प्रवाहित

Perfect Apple : बाहेरून मस्त दिसणारा सफरचंद आतून खराब निघतो; वाचा गोड आणि टेस्टी Apple ओळखण्याच्या टिप्स

Tomato Side Effects: या लोकांनी टोमॅटो खाणे आरोग्यासाठी घातक

SCROLL FOR NEXT