युवासेनेने थाळ्या वाजवत वेधले लक्ष; महागाई, इंधन दरवाढीचा निषेध

युवासेनेने थाळ्या वाजवत वेधले लक्ष; महागाई, इंधन दरवाढीचा निषेध
Jalgaon YuvaSena
Jalgaon YuvaSenaSaam tv

जळगाव : महागाई, इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनेने आज जळगाव शहरात थाळ्या वाजवत आंदोलन केले. मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत टीका केली. केंद्र सरकार वारंवार पेट्रोल– डिझेलची दरवाढ सुरु ठेवल्याने सामान्याचे जीवन विस्कळीत झाले आहे. इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी करत युवासेनेने (Yuva Sena) आज थाळी बजाव आंदोलन केले. (jalgaon Yuvasena drew attention by playing platters Protest against inflation)

युवासेनेतर्फे इंधन दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचा अभिनंदन सोहळा हा आगळा वेगळा राज्यव्यापी आंदोलन करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवासेनेतर्फे आंदोलन झाले. नशिराबाद बाजारपेठेत युवासेना (Jalgaon) जळगाव ग्रामीणतर्फे थाळी वाजवून, घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, युवासेना विस्ताराक किशोर भोसले, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, महानगरप्रमुख स्वप्नील परदेशी आदी युवासैनिक ऊपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com