Jalgaon Yawal News Saam tv
महाराष्ट्र

Yawal : आईजवळ झोपलेल्या चिमुकलीवर बिबट्याची झडप; शीर केले धडावेगळे, परिसरात घबराट

Jalgaon Yawal News : डांभुर्णी शिवारामध्ये असलेल्या एका शेतात मेंढपाळ उतरले आहेत. याठिकाणी झोपडी टाकून परिवार वास्तव्यास आहे. उन्हाळा असल्याने झोपडीच्या बाहेरच अंथरून टाकून परिवारातील सदस्य झोपले

संजय महाजन

यावल (जळगाव) : रात्रीच्या वेळी आईजवळ झोपलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने झडप घालत उचलून नेले. यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना जळगावच्या यावल तालुक्यात डांभुर्णी शेतशिवारात घडली आहे. काही अंतरावर या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला असून शीर धडापासून वेगळे केलेल्या छिन्नविछिन्न अवस्थेत होता. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. 

यावल तालुक्यातील डांभुर्णी गावाच्या शिवारात हि दुर्दैवी घटना घडली आहे. यात रत्नाबाई सतीश रुपनर (वय २) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. डांभुर्णी शिवारामध्ये असलेल्या एका शेतात मेंढपाळ उतरले आहेत. याठिकाणी झोपडी टाकून परिवार वास्तव्यास आहे. उन्हाळा असल्याने झोपडीच्या बाहेरच अंथरून टाकून परिवारातील सदस्य झोपले. यात दोन वर्षीय चिमुकली हि आईजवळ झोपली होती. 

मध्यंतरीच्या सुमारास हल्ला 

सर्वजण गाढ झोपेत असताना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बिबट्याने झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेले. जवळ झोपलेल्या आईला देखील काहीच चाहूल लागली नाही. बिबट्याने जबड्यात धरून मुलीला उचलून नेत असताना मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून आईला जाग आली. मात्र मुलगी न दिसल्याने आईने आरोड्या मारल्या. मात्र तोपर्यंत बिबट्याने चिमुकलीचे शिर धडा वेगळ केल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला. 

परिसरात भीतीचे वातावरण 

दरम्यान सकाळी या चिमुकलीचा शोध सुरू घेतला असता तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत अढळून आला. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यासह बिबट्याचा शोध सुरू आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात बिबच्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असून यावल तालुक्यात परिसरातील शेतकरी व मजूरांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी प्या मेथी आणि सब्जाचे पाणी, १५ दिवसांत कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी

Solapur: सोलापूर हादरले! पहाटे ट्रेनवर थरारक दरोडा, प्रवाशांना मारहाण; महिलांनाही सोडलं नाही, मोबाईल अन् दागिने लुटले

SCROLL FOR NEXT