पराग ढोबळे
नागपूर : मध्य रेल्वेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराला आयकर विभागाकडून वसुली नोटीस बजावण्यात आली आहे. तब्बल ३१४.१९ कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिन्याला २० ते २५ हजार रुपये उत्पन्न असलेले चंद्रशेखर कोहाड यांना आयकर विभागाची नोटीस मिळाल्यावर धक्का बसला आहे. याप्रकरणी आयकर आयुक्तांकडे अपील दाखल करणार असल्याचे ते सांगत आहेत.
नागपूरच्या बिनाकी मंगळवारी परिसरात पाच वर्षांपूर्वी चंद्रशेखर कोहाड राहत होते. मध्य रेल्वेत मजुरीचे काम करणारे कोहाड यांनी २०११ मध्ये इतवारी परिसरातील एका क्रेडिट सोसायटीत खाते उघडले होते. सध्या ते बैतुल येथे राहतात. आर्थिक अनियमिततेमुळे सरकारने सोसायटी सील केली. मात्र त्या दरम्यान कोहाड यांच्या खात्याचा वापर करून ४२ कंपन्यांचा आर्थिक गैरव्यवहार करण्यात झाले होते. या प्रकरणी कोहाड यांना ऑक्टोबर २०२० मध्ये ईडीच्या विशाखापट्टणम कार्यालयाने समन्स बजावले होते.
हवालाच्या माध्यमातून विदेशात कोट्यवधी रुपये पाठविल्याचा आरोप
कोहाड यांच्या खात्यातून कंपन्यांनी कोट्यवधींचे व्यवहार केले होते. त्यापैकी १२ कंपन्यांवर हवालाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये विदेशात पाठवल्याचा आरोप आहे. ईडीच्या विशाखापटनम येथील ऑफिसकडून कोहाड यांना १५ दिवसात उपस्थित राहण्याचे समन्स पाठवले होते. मात्र कोहाड यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर ईडीने हे प्रकरण नागपूरच्या आयकर विभागाकडे पाठवले. यानंतर आयकर विभागाने डिसेंबर २०२४ मध्ये ३१४.७९ कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे.
आयकर आयुक्तांकडे अपील दाखल करणार
चंद्रशेखर कोहाड पाच वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील मूलताई येथे स्थायिक झाले आहेत. आयकर अधिकाऱ्यांना त्यांचा पत्ता मिळत नव्हता. अखेर काही दिवसांपूर्वी कोहाड यांच्या मोबाईलवर व्हाट्सएपच्या माध्यमातून वसुलीची नोटीस पाठवण्यात आली. नोटीस मिळताच त्यांना जबर धक्का बसला. आयकर विभागाने या व्यवहाराची पाळेमुळे शोधून काढावी आणि खऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी; असे कोहाड यांची मागणी आहे. याप्रकरणी आयकर आयुक्तांकडे ते अपील दाखल करणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.