Black Turmeric : काळ्या हळदीला प्रतिकिलो एक हजार रुपये भाव; नांदेडचा शेतकरी घेतोय लाखोंचे उत्पादन

Nanded News : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शिवार घोडेकर या शेतकऱ्यांने साधारण पाच वर्षांपूर्वी ५०० ग्राम हळदीचे बेणे घेऊन लागवड केली. हळदीचे बेन पुन्हा- पुन्हा लावून आता हळदीचे तीन क्विंटल उत्पादन
Black Turmeric
Black TurmericSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी
नांदेड
: हळद फक्त पिवळ्या रंगाचीच असते असे अनेकांना माहित आहे. परंतु पिवळ्या रंगाच्या हळदी व्यतिरिक्त काळी हळद देखील असते. विशेष म्हणजे अधिक औषधी गुणधर्म असलेल्या या काळ्या हळदीला मागणी आणि तुलनेत दर देखील अधिक असतो. सध्या नांदेडच्या मार्केटमध्ये काळ्या हळदीला प्रतिकिलो एक हजार रुपये इतका दर मिळत आहे. यामुळे कमी क्षेत्रात अधिक फायदा काळ्या हळदीच्या शेतीमुळे होत आहे. 

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शिवार घोडेकर या शेतकऱ्यांने साधारण पाच वर्षांपूर्वी ऑनलाईन पद्धतीने १७०० रुपयाचे ५०० ग्राम हळदीचे बेणे घेऊन लागवड केली होती. तेच हळदीचे बेन पुन्हा- पुन्हा लावून आता त्या शेतकऱ्यांनी हळदीचे तीन क्विंटल उत्पादन काढले आहे. आता या हळदीचा बाजारभाव तीन लाख रुपये एवढा आहे. या हळदीला शेणखत, गांडूळ खत, निंबोळी अर्क, गोमूत्र फवारणी करत जोपासना केली. 

Black Turmeric
Amravati Airport : अमरावती विमानतळाचे उद्घाटन झालं, पण २४ तासांत नामांतराचा वाद पेटला

एक हजार रुपये किमतीने खरेदी 

काळ्या हळदीचे उत्पादन घेतल्याने हि हळद डॉक्टर, परिसरातील शेतकरी, आयुर्वेदिक मेडिकल चालक एक हजार रुपये प्रति किलोने खरेदी करत आहेत. ही हळद विकण्यासाठी कोणत्याही कंपनीशी करार केलेला नाही. मात्र अनेक लोक ही हळद खरेदी करत आहेत. यातून चांगला नफा देखील होत असल्याचे हळद उत्पादक शेतकरी शिवार घोडेकर यांनी सांगितले.

Black Turmeric
Satara Water Crisis : माण तालुक्यामध्ये पाणीटंचाई; तालुक्यातील ४२ गावांना टँकरने पाणीपुरवठा

काय आहेत काळ्या हळदीतीत औषधी गुणधर्म

रोजच्या वापरातील पिवळ्या हळदीपेक्षा काळ्या हळदीमध्ये अधिक औषधी गुणधर्म असतात. यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म अधिक असतात. यामुळे याचे सेवन मानवी आरोग्यासाठी लाभदायी ठरत असते. याचे सेवन केल्याने मानवी शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय पचन क्षमता वाढविन्यासह शारीसाठी अधिक गुणकारी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com