Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: घरातून गेले पळून; पोलिसांनी पकडल्‍यानंतर मुलीचा धक्कादायक जबाब, मुलासह बापावर गुन्‍हा

घरातून गेले पळून; पोलिसांनी पकडल्‍यानंतर मुलीचा धक्कादायक जबाब, मुलासह बापावर गुन्‍हा

साम टिव्ही ब्युरो

वरणगाव (जळगाव) : फेसबुकवरून मुलासोबत ओळख झाली. दोघांमध्ये प्रेम जुळून आले. मुलगी अल्‍पवयीन असून यानंतर दोघेही घरातून पळून गेले. पोलिसांनी (Police) शोध घेतल्‍यावर दोघेही सापडून आले. मात्र यानंतर मुलीने दिलेल्‍या जबाबात बापासह प्रियकराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Crime News) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. (Saam Letest News)

वरणगाव (Varangaon) परिसरातील एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीची फेसबुकवर मुलासोबत ओळख झाली. यातून दोघांमध्ये प्रेम जमले व दोघेजण २९ सप्टेंबरला घरातून पळून गेले. मुलगी घरी न आल्यामुळे तिच्या वडीलांनी पोलिसात तक्रार दिली होती. सपोनि आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नरसिंग चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी (Gujrat) गुजरातमधील सोरटी सोमनाथ येथून या दोघांना ताब्यात घेतले.

बाल कल्याण समितीकडे पिडीतेचा धक्कादायक जबाब

मुलगी अल्‍पवयीन असल्‍याने तिला बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले. यानंतर समितीकडे मुलीने धक्कादायक जबाब दिला. यात प्रियकर व वडिलांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले. यावरून वरणगाव पोलिसात प्रियकर व मुलीच्या बापाविरुद्ध पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली असून त्‍यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पीएसआय परशुराम दळवी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT