MSEDCL News: आता वीज खांबावर मीटर; गळती रोखणार

महावितरण कंपनीने आता सर्वाधिक वीज चोरीच्या भागांमध्ये खांबांवर मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
MSEDCL News
MSEDCL NewsSaam tv
Published On

धुळे : शहरात वीज चोरीच्या घटनांमुळे त्रस्त महावितरण कंपनीने आता सर्वाधिक वीज चोरीच्या भागांमध्ये खांब्यावर मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी साहित्य येथील कार्यालयास (Dhule News) प्राप्त झाले असून, काही दिवसात ही प्रक्रिया सुरू केली जाईल. वीज चोरी रोखण्यासाठी केबलच्या वापरासह विविध उपाययोजना करूनही प्रभाव दिसत नसल्याने वीज खांब्यावरील मीटरद्वारे महावितरण कंपनी (MSEDCL) कितपत या प्रयोगातून यश मिळवते याकडे सर्वांचे लक्ष असेल. (Dhule MSEDCL News)

MSEDCL News
Himayatnagar : किनवट - नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात युवकाचा मृत्यू

धुळे (Dhule) शहरात वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा संबंध भारनियमनाशी जोडला जातो. यात ज्या भागात (Electricity Theft) वीज चोरी अधिक, त्या भागात भारनियमन अधिक, असे महावितरण कंपनीचे सूत्र आहे. मात्र, वीज चोरीच्या अशा प्रकारांमध्ये नियमित वीज बिल भरणारे ग्राहकही भारनियमनात रगडले जातात. त्यामुळे ते रोष व्यक्त करत असतात.

शहरात सरासरी ६० टक्‍के वीजचोरी

महावितरण कंपनीने धुळे शहरात वीज चोरीबाबत सर्वेक्षण केले. यात वडजाईत सर्वाधिक सरासरी ६५ ते ७० टक्के वीज चोरी होते. तसेच मोठ्या पुलाजवळील पंचवटीपासून ते सुशी नाल्यालगत परिसरापर्यंत सरासरी ६० टक्के, साक्री रोडसह विविध भागातही सरासरी ५० ते ६० टक्के वीज चोरी होते. मीटरमध्ये फेरफार करणे, आकडे टाकणे, चुंबकीय पद्धतीचा वापर करून मीटरचा वेग कमी करणे आदी विविध प्रकारातून वीज चोरी केली जाते. शहरात वीज चोरीचे प्रमाण वाढून सरासरी ३० टक्के झाले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होते. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने वीज चोरी रोखण्यासाठी आता प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. तसेच लवकर अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली आहे.

संरक्षित पेटीत दहा मीटर

शहरात सर्वाधिक चोरी होत असलेल्या भागातील घरांमध्ये वीज मीटर न बसविता ते त्या गल्ली किंवा कॉलनीतील खांब्यावर बसविले जाईल. एका संरक्षित पेटीत एक मीटर या प्रमाणे खांब्यावर दहा ते बारा मीटर बसविले जातील. त्यामुळे वीज चोरीला आळा बसेल, असे महावितरण कंपनीला वाटते. वीज खांब्यावर सरासरी तीन ते चार फूट लांबीच्या संरक्षित पेटीत दहा ते बारा मीटर बसविले जातील. मीटरच्या देखभालीची जबाबदारी त्या- त्या भागातील शाखा अभियंता, सहकारी अधिकाऱ्यांवर असेल. संबंधित ग्राहकाचा मीटर क्रमांक तपासून दरमहा रीडिंग घेतले जाईल. नंतर संबंधित ग्राहकास बिल दिले जाईल. संरक्षित पेटीला लॉकही असेल. ऊन, वारा, पावसातही पेटी सुरक्षित राहील, अशी रचना आहे. ठेकेदारामार्फत त्या- त्या भागात वीज खांब्यावर मीटर बसविले जाईल. सर्वप्रथम वडजाई येथे खांब्यावर वीज मीटर बसविल्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्यत्र चोरी होत असलेल्या भागात ते बसविले जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com