Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News: देवदर्शन करून परततांना काळाचा घाला; पत्नीसमोरच पतीचा मृत्यू

देवदर्शन करून परततांना काळाचा घाला; पत्नीसमोरच पतीचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

वरणगाव (जळगाव) : येथुन जवळच असलेल्या चौपदरी मुंबई– नागपूर महामार्गावरील फुलगाव उड्डाण पुलावर हरताळा येथुन मोटरसायकलने देवदर्शन घेऊन (Bhusawal) भुसावळकडे परतणाऱ्या दाम्‍पत्याला अज्ञात वाहनाने (Accident) धडक दिली. यात पतीचा मृत्‍यू झाला असून पत्‍नी जखमी आहे. ग्रामिण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. (Tajya Batmya)

मुंबई– नागपूर चौपदरी महामार्गावरील फुलगाव जवळील उड्डाण पुलावर आज (५ मे) सकाळी ही घटना घडली. भुसावळ येथील ललीत प्रभाकर नेमाडे (वय ४८) हे पत्नी निता नेमाडेसह पौर्णिमेच्या मुहुर्तावर हरताळा येथे सकाळीच मोटारसायकलने देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून परतत असतांना फुलगावजवळील उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात पती– पत्नी फेकले गेले. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले.

उपचारापुर्वीच मृत्‍यू

त्यांना महामार्गाच्या रुग्णवाहिकेने वरणगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. मात्र ललीत नेमाडे यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयताची पत्नी निता ललीत नेमाडे (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन अज्ञात वाहनाचा व पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कुमार आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT