Jalgaon Husband kills wife over affair suspicion Saam
महाराष्ट्र

Jalgaon Crime: अनैतिक संबंधाचं भूत डोक्यात शिरलं, नवऱ्यानं बायकोच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला; घरात रक्ताचा सडा

Husband kills wife over affair suspicion: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. आरोपीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Bhagyashree Kamble

सांगलीत चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने बायकोची हत्या केली असल्याची बातमी ताजी असतानाच जळगावातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. चारित्र्याच्या संशयातून नवऱ्याने बायकोच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली आहे. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, त्यांचा दहा वर्षांचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावला आहे. या प्रकरणानंतर जळगाव हादरलं आहे.

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. शितल उर्फ आरती सोनवणे असे मृत महिलेचे नाव आहे. तर, सोमनाथ सोनवणे असे पती आरोपीचे नाव आहे. नवऱ्याचा बायकोवर संशय होता. तिचे अनैतिक संबंध सुरू आहेत. असा संशय नवऱ्याला होता.

या कारणावरून दोघांमध्ये भांडण होत. रागाच्या भरात त्याने रात्रीच्या वेळी तिची हत्या करायची असं ठरवलं. मध्यरात्र झाल्यानंतर सोमनाथने आरतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. या मारहाणीत आरती रक्तबंबाळ झाली. या हल्ल्यात दहा वर्षांचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावला. मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

या घटनेनंतर जखमी ग्रस्त महिलेला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेच्या भावाने पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. भावाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी सोमनाथला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

SCROLL FOR NEXT