Raver News Saam tv
महाराष्ट्र

Raver News : दोन महिन्याच्या चिमुकलीला झोळीत झोपवून आई लागली कामाला; क्षणात घडले भयावह 

Jalgaon News : खरगोन जिल्ह्यातील अनिल सालम भिलाला परिवारासोबत काममिनित्ताने रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे आहे. शेतमजुरी करण्यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून राजू गुप्ता यांच्या शेतात आले आहेत

Rajesh Sonwane

जळगाव : आपल्या दोन महिन्याच्या चिमुकल्याला घेऊन आई शेतात काम करण्यासाठी गेली होती. दोन महिन्याचे बाळ रडत असल्याने त्याला झोपविण्यासाठी आई आली. या बाळाला झोळीत टाकून आई पुन्हा कामाला लागली. मात्र याठिकाणी आलेल्या भटक्या कुत्र्यांनी बाळाला झोळीतून ओढत नेत गंभीर चावे घेतल्याने सदर बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यात घडली आहे. 

खरगोन जिल्ह्यातील अनिल सालम भिलाला हे परिवारासोबत काममिनित्ताने रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे आला आहे. अनिल भिलाला हे शेतमजुरी करण्यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून राजू गुप्ता यांच्या शेतात आले आहेत. त्यांना श्याम आणि आशिया (वय ५) आणि दिव्या (वय २ महिने) मुले आहेत. दरम्यान ७ मार्चला सकाळी अनिल भिलाला आणि त्यांची पत्नी मीना असे शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी शेतमालक आणि गावातील काही मजूर काम करीत होते. 

कुत्र्यांच्या झुंडने चढविला हल्ला 

दरम्यान भिलाला यांची २ महिन्यांची मुलगी दिव्या हिला झोप लागत असल्याने तिला झाडाला झोका बांधून झोक्यामध्ये झोपवले होते. त्यानंतर दिव्याची आई- वडील हे शेतात काम करत होते. याच वेळी त्यांना चार ते पाच कुत्रे शेतात पळत असताना दिसले. हे कुत्रे जेवणाच्या डब्याकडे जात आहे असे मजुरांना वाटले. त्यावेळी अनिल भिलाला हे कुत्र्यांच्या मागे पळाले असताना त्यांना झोक्यात झोपवलेल्या बाळाला कुत्रे ओढून नेत असल्याचे निदर्शनास आले. 

अखेर चिमुकलीचा मृत्यू 

दिव्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले. मात्र कुत्र्यांच्या हल्ल्यात दिव्याला जखमा झाल्या होत्या. तिला लागलीच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दिव्याची तब्येत अधिक बिघडल्याने तिला जळगावला शासकीय रुग्णालयात नेण्याने सांगण्यात आले. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिव्याला तपासून मृत घोषित केले. कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lemon Water Vs Ginger Water: लिंबू की आल्याचे पाणी, वजन कमी करण्यासाठी काय प्यावे?

Ramayana Yash Look: ३३ किलोचे कपडे, १.८ किलोचा मुकुट; 'रामायण'मध्ये असा साकारला यशचा रावण लूक!

Maharashtra News Live Update: शिवसेना नेते मुकेश जिवतोडे पोलिसांच्या ताब्यात

CO, BDO सह १५ सरकारी अधिकारी तडकाफडकी सस्पेंड; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ

महाकाय अजगरावर मुलांची घसरगुंडी! थरारक VIDEO पाहाच

SCROLL FOR NEXT