Turmeric Price : हळदीला उच्चांकी दर; सांगली बाजार समितीत ३० हजाराचा मिळतोय दर

Sangli News : सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. या आठवड्यात उच्चांकी दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
Turmeric Price
Turmeric PriceSaam tv
Published On

सांगली : हळद काढणीला सुरवात झाली असून काढणीनंतर शेतकरी विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणत आहे. दरम्यान सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला अधिकच चांगला दर मिळू लागला आहे. या आठवड्यात पार पडलेल्या हळद सौद्यामध्ये तब्बल ३० हजार प्रतिक्विंटल इतका उच्चांक दर हळदीला मिळाला आहे. त्यामुळे हळदीला सोन्याची झळाळी मिळत आहे.

हळद काढणी झाल्यानंतर हळद उत्पादक शेतकरी विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणू लागला आहे. यात सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. व्यापाऱ्यांकडून सौदे पार पडले जात असून या आठवड्यात उच्चांकी दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Turmeric Price
Strawberry Farming : सातपुड्यात बहरली स्ट्रॉबेरी शेती; आदिवासी शेतकऱ्यांनी पिकविली उत्तम दर्जाची स्ट्रॉबेरी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे वसंत दादा मार्केट यार्ड येथे सदाशिव मल्लाप्पा शिंनदोळी (रा. गुरलापूर, ता. मोडलगी, जि. बेळगाव) या शेतकऱ्याच्या हळदीला ३० हजार प्रति क्विंटल उच्चांकी दर मिळाला. ही खरेदी बंडा बाळा फराटे या आडत दुकानामार्फत यु के खिमजी अँड कंपनी या खरेदीदाराने केली. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद विक्रीसाठी आणावी असे आव्हान सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केली आहे.

Turmeric Price
Washim Water Shortage : ७९ विहिरींच्या निरीक्षणातून धक्कादायक वास्तव आले समोर; वाशीम जिल्ह्यावासीय चिंतेत

अमरावती बाजार समितीत १७ हजार पोते धान्यांची आवक
अमरावती
: अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत १७ हजार पोत्याची विक्रमी आवक झाली. यामध्ये सर्वाधिक ७ हजार ७ पोते हरभरा, ५५९३ पोते तूर, ३ हजार ४८५ सोयाबीन आणि ९१२ पोती गव्हाची आवक झाली. सध्या हंगाम सुरू असल्याने आणि नाफेडमध्ये शेतमालाची खरेदी होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. मार्च अखेरीस शेतकऱ्यांना कृषी कर्ज भरायचे असल्याने बाजार समितीत दलालांमार्फत शेतकरी शेतमाल विकताना दिसतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com