St Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

St Bus Accident: बस-दुचाकी अपघातात एक ठार; दुचाकीला वाचविताना बस खड्ड्यात

Jalgaon News : बस-दुचाकी अपघातात एक ठार; दुचाकीला वाचविताना बस खड्ड्यात

Rajesh Sonwane

रावेर (जळगाव) : रावेर तालुक्यातील धामोडी येथे एसटी व दुचाकीच्या झालेल्या अपघातात अजंदे येथील (Jalgaon) एकाचा मृत्यू झाला. तर यावल तालुक्यात अन्य एका अपघातात (Accident) दुचाकीला वाचविताना बस खड्ड्यात गेल्याने तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. (Maharashtra News)

रावेर तालुक्यातील अजंदे येथील श्री समर्थ कृषी केंद्राचे संचालक बबन भाऊराव पाटील (वय ३४) हे धमोडी येथून कांडवेल गावाकडे जात होते. या दरम्यान कांडवेलकडून धामोडीकडे येणारी एसटी बस व दुचाकीच्या झालेल्या अपघातात बबन पाटील यांचा मृत्यू झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. (Bus Accident) बसचालक जगन्नाथ गंभीर लवंगे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत सुरेश सुकलाल पाटील (अजंदे) यांनी निंभोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

अन्य घटनेत तीन विद्यार्थी जखमी 

यावल जात असलेल्या बस चालकाने रस्त्यात उभ्या असलेल्या दुचाकी वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या खाली खड्ड्यात उतरली. यात बसमध्ये बसलेले तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satpura Tourism: धुक्याने नटलेले सातपुडा; ‘विंटर वंडरलँड’ पाहण्यासाठी लोकांची उसळली गर्दी

EPFO Rule: EPFOचे ८ नियम बदलले; कर्मचाऱ्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम

KDMC निवडणुकीपूर्वी वातावरण तापलं; २७ गावांचा प्रश्न पेटला, स्वतंत्र नगरपालिकेची मागणी

दादरमधील स्टार मॉलला भीषण आग; अग्निशमन दलाचं बचावकार्य सुरू|VIDEO

Maharashtra Live News Update: पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून तरुण पडला

SCROLL FOR NEXT