Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident : दुचाकी कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Jalgaon News : समोरून भरधाव वेगाने कार आल्याने कार चालक व दुचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे दुचाकी व कारची समोरासमोर धडक झाली.

Rajesh Sonwane

सावदा (जळगाव) : कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील (Jalgaon) दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक देखील या अपघातात जखमी झाला आहे. त्याला लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

सदरचा अपघात (Accident) सावदा- पाल महामार्गावर सावदा- कोचूर दरम्यान घडला. या अपघातात चिनावल येथील वीरेंद्र सुनील नेमाडे (वय २७) व अनिल चुडामण मेढे (वय ६५) यांचा मृत्यू झाला. वीरेंद्र नेमाडे व अनिल मेढे हे दुचाकीने जात होते. या दरम्यान समोरून भरधाव वेगाने कार आल्याने कार चालक व दुचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे दुचाकी व कारची समोरासमोर धडक झाली. जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील दोघेजण फेकले जाऊन यात त्यांचा मृत्यू झाला. 

तर कार चालक किरकोळ जखमी झाले आहेत. कार चालकास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सहाय्यक (Police) पोलिस निरीक्षक जालिंदर पळे व सहकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला आहे. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक तडवी आणि सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार नाहीत? महत्वाची अपडेट समोर

Film Festival: ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरु; 'या' दिवसापासून रंगणार महोत्सव

Eyeliner Tips: परफेक्ट आयलाइनर कसं लावायचं? जाणून घ्या 8 सोप्या स्टेप्स

Maharashtra Live News Update : अजितदादा-लांडगेंच्या वादात; देवेंद्र फडणवीसांकडून महेश लांडगेंची पाठराखण

Parenting Tips: सावधान! तुम्ही तुमच्या लहान मुलांसमोर कपडे बदलता का? वाईट सवय तर लावत नाहीत ना?

SCROLL FOR NEXT