Eknath Khadse
Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

शिवसेना बेडूक नव्हे हत्ती हे दाखवून द्या; खडसेंनी दिले महाजनांना प्रत्युत्तर

साम टिव्ही ब्युरो

मुक्ताईनगर (जळगाव) : शिवसेना म्हणजे गटारीतला बेडूक असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर खडसे म्हणाले, की शिवसेना बेडूक नाही, हत्ती आहे हे महाजनांना दाखवून द्या. शिवसेना (Shiv Sena) माजी शहरप्रमुख बाळाभाऊ भालशंकर यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा तथा आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी चेअरमन रोहिणी खडसे (Rohini Khadse) हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (jalgaon political news eknath Khadse replied to girish Mahajan)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल आपल्या जाहीर सभेमधून भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर भाजपकडून प्रत्त्युत्तर दिले जात आहे. अशातच भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली. या वेळी गिरीश महाजन यांची जीभ घसरली. शिवसेना म्हणजे गटारातली बेडूक, असा घणाघात गिरीश महाजनांनी केला. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर दिले. या वेळी काही कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला. त्यात राजू माळी, प्रवीण पाटील, बापू ससाणे, विनोद सोनवणे, दीपक साळुंके, योगेश काळे, सोनू पाटील, संजू माळी, नंदू हिरोळे, प्रकाश खेवलकर, अप्पा नाईक, श्रवण पाटील आदींचा समावेश आहे.

पालकमंत्री तर महाजनांसोबत चहा घेतात

महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या गिरीश महाजनांना शिवसेना उत्तर का देत नाही?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. एका बाजूला गिरीश महाजन शिवसेनेला सातत्याने हिणवतात. शिवसेनेवर टीका करतात. आणि दुसऱ्या बाजूला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) महाजनांसोबत चहा घेतात. जेवण करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना म्हणजे गटारीतला बेडूक असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी ही टीका केली. तसेच शिवसेना बेडूक नाही, हत्ती आहे हे महाजनांना दाखवून द्या, असंही खडसे यांनी म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहतील; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

Love Marriage Tips : लव्ह मॅरेज करताय? सासूबाईंना इंप्रेस करण्यासाठी खास टीप्स

Airtel Data Plans: 'हे' आहेत एअरटेलचे ५ स्वस्त डेटा रिचार्ज प्लान! पहा संपूर्ण यादी

Today's Marathi News Live : उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Jat Drought Area : पाण्याचे स्त्रोत आटले; 2 दिवसांत म्हैसाळ सिंचनातून तलाव, विहिरी भरणार : जत प्रांताधिकारी

SCROLL FOR NEXT