कोरोना दूर गेल्यानंतर लसीकरणाकडेही पाठ; ६० टक्के लाभार्थ्यांचा दुसरा डोस बाकी

कोरोना दूर गेल्यानंतर लसीकरणाकडेही पाठ; ६० टक्के लाभार्थ्यांचा दुसरा डोस बाकी
Corona Vaccination
Corona VaccinationSaam tv
Published On

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका कमी झाल्याने जनजीवनासह व्यवहार रुळावर येत आहे. हे संकट पुन्हा येऊ नये अशीच सर्वांची अपेक्षा आहे. मात्र, जून-जुलैमध्ये पुन्हा धोका संभवण्याचा इशारा असल्याने धाकधूक कायम आहे. दरम्यान, कोरोनाचा हा धोका कमी झाल्यानंतर कोविड-१९ लसीकरणाकडेही नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसते. धुळे (Dhule) शहराची स्थिती पाहिली तर अद्यापही साधारण २५ टक्के लाभार्थी कोविड लशीपासूनच दूर आहेत तर साधारण ४० टक्के लाभार्थ्यांनी लशीचा (Corona Vaccination) दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे भविष्यात संकट उभे ठाकलेच तर पुन्हा कसरत करावी लागेल असे दिसते. (dhule news no vaccination after the corona is gone)

Corona Vaccination
कोरोनाने टेन्शन वाढवलं! देशातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मृत्यूचा आकडाही वाढला!

कोरोना (Corona) विषाणू संसर्गाने साधारण दोन वर्ष संपूर्ण जगाला हैराण केले. दरम्यान, आता संसर्गाचा धोका आता कमी झाल्याने सरकारांसह आरोग्य, प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांनाही मोठा दिलासा आहे. दरम्यान, आजघडीला काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या बातम्या आल्यानंतर पुन्हा धस्स होते. केंद्र, राज्य सरकारेही यादृष्टीने लक्ष ठेवून आहेत. भविष्यात कोरोनाची लाट आलीच तर पुन्हा मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शंभर टक्के लसीकरण होणे हाच प्रभावी उपाय आहे. त्याअनुषंगाने प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोविड-१९ लसीकरणाच्या अनुषंगाने धुळे शहराची स्थिती पाहिली तर अद्यापही शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट दूर असल्याचे दिसते.

२५ टक्के लशीपासूनच दूर

शहरात कोविड लसीकरणासाठी पात्र १२ वर्षावरील लाभार्थी एकूण तीन लाख ७३ हजार ३४८ एवढी आहे. या अपेक्षित लाभार्थ्यांपैकी १२ मेपर्यंत एकूण दोन लाख ८४ हजार १५३ लाभार्थ्यांनी कोविड लशीचा पहिला डोस घेतला आहे. अर्थात लसीकरणाची ही टक्केवारी ७६.१० टक्के एवढी आहे. त्यामुळे साधारण २४ टक्के लाभार्थी अद्यापही कोविड लशीपासूनच दूर आहेत. दुसरा डोस न घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्याही साधारण ४० टक्के आहे. बुस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही नगण्य दिसते. त्यामुळे लसीकरणासाठी लाभार्थ्यांना पुन्हा पुढे आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत. महापालिकेकडून आजही कोविड लसीकरण सत्र सुरू असतात. मात्र, तेथे लाभार्थ्यांची वानवा दिसते.

कोविड लसीकरण स्थिती (१२ मेपर्यंतची)

-१२ वर्षावरील अपेक्षित लाभार्थी......३७३३४८

-पहिला डोस.........२८४१५३ (७६.१० टक्के)

-दुसरा डोस..........२२०९५७ (५९.१८ टक्के)

-बुस्टर डोस................................४७८९

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com