Jalgaon Police Raid On Bungalow Busted Prostitute Racket 
महाराष्ट्र

४ महिला, ३ ग्राहक अन् एक पंटर...; बंगल्यावर अचानक धाड पडली अन् सगळंच बिंग फुटलं

Jalgaon Police Busted Prostitute Racket : जळगावच्या पिंप्राळा हुडको परिसरातील बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत 4 महिलांची सुटका करण्यात आली असून 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Bharat Jadhav

  • जळगावच्या पिंप्राळा हुडको परिसरात पोलिसांची धडक कारवाई करण्यात आली.

  • एका बंगल्यात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला.

  • पोलिसांनी कारवाईत 4 महिलांची सुटका केली.

संजय महाजन, साम प्रतिनिधी

जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार समोर आलाय. शहरातील पिंप्राळा हुंडको परिसरातील एका बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांच्या धाडीनंतर बंगल्यातील प्रकार उघडकीस आला. बंगल्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर धडक कारवाई केलीय. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ४ पीडित महिलांची सुटका केली आहे. तर ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील एका बंगल्यात बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि तात्काळ सदर बंगल्यावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून संशयितांना ताब्यात घेतले असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सदर ही कारवाई प्रभारी उप पोलीस अधीक्षक सह्याद्री बिर्ले,रामानंदनगर पोलीस स्टेशचे निरीक्षक मधुकर साळवे याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, पीएसआय दिनेश बडगुजर,राजेश पाटील, सहाय्यक फौजदार संजय हिवरकय, भूषण कोल्हे,अनिल पाटील,मनिषा पाटील, राखी खाटीक,हे.काँ. दिपक पाटील,कीरण धनगर,संगपाल तायडे,अमित माळी,रामानंदनगर पोलीस स्टेशन चे जितेंद्र राजपूत ,व जितेंद्र राठोड यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: गुगल Gmail बंद करणार? तुमचा जीमेलचा डेटा जाणार?

Maharashtra News Live Update: जालना पोलीस अधीक्षकांची जरांगे पाटलांशी चर्चा सुरू

महाराष्ट्रात 2 कोटी 7 लाख मतदार अपात्र, तुम्ही मतदानाला मुकणार?

काँग्रेस जिल्हाध्यक्षांना मार्शल आर्ट ट्रेनिंग; नाशिकच्या प्रशिक्षणात राहुल गांधींचाही सहभाग

Jalgaon Earthquake: रावेरच्या सातपुडा पर्वत भागात भूकंपाचे धक्के; मोहगण परिसर हादरला, प्रशासन अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT