Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : पोलीस प्रशासनात खळबळ; १५ हजारांची लाच घेताना दोन पोलिस कर्मचारी ताब्यात

Jalgaon News : पारोळा तालुक्यातील शेळावे येथील तक्रारदार ७ नोव्हेंबरला दुचाकीने पारोळा ते धरणगाव रस्त्यावरून जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीशी धडक

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : धरणगाव रस्त्यावर झालेल्या अपघात प्रकरणी संशयितास अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून तीस हजारांची लाच मागितली. तडजोड अंती ठरलेली १५ हजार रुपयांची लाच घेताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

पारोळा (Parola) तालुक्यातील शेळावे येथील तक्रारदार ७ नोव्हेंबरला दुचाकीने पारोळा ते धरणगाव रस्त्यावरून जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीशी धडक झाली. या अघतातात समोरील दुचाकीवरील इसम मृत झाला. याबाबत तक्रारदाराविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न करण्यासाठी पारोळ्याचे पोलिस हिरालाल देविदास पाटील (वय ४३) व प्रवीण विश्वास पाटील (वय ४५) यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांच्या (Bribe Case) लाचेची मागणी केली.

दरम्यान तडजोडीअंती १५ हजार रुपयांची तक्रारदारकडे लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी दिली. त्यावरून एसीबीने सापळा रचला. एका संशयिताने तक्रारदालाला भ्रमणध्वनीवरून रक्कम घेऊन येण्यास सांगितले, तर दुसऱ्या संशयिताने रक्कम स्वीकारली असता, त्यास मुद्देमालासह पकडण्यात आले. यातील एका संशयितास पकडण्यात आले असून, दुसरा फरार आहे. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पथकाने केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाबाहेर पत्ते खेळून आंदोलन

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे हेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात; शरद पवार गटाच्या आमदाराचा दावा

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत? रवींद्र चव्हाण म्हणाले,राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो | VIDEO

Maharashtra Politics : नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार? बडा नेता भाजपच्या वाटेवर, पक्षांतरावर नेत्याचं मोठं वक्तव्य

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे ब्रिटीशकालीन धरण ९२ टक्के भरलं, पाणीचिंता मिटणार?

SCROLL FOR NEXT