Parola News Saam tv
महाराष्ट्र

Parola News : कारमध्ये गॅस भरताना कारसह सहा सिलेंडर जप्त

Jalgaon News : गेल्या दीड ते दोन महिन्यात अवैध गॅस सिलिंडरचा स्पोट व गॅस भरताना कार जळाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस अवैधपणे गाड्यांमध्ये भरला जात असतो. अशाच प्रकारे कारमध्ये घरगुती (Gas) गॅस भरत असताना पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पारोळा (Parola) पोलिसांनी गॅस भरण्यासाठीचे कीट व सहा सिलिंडर जप्त केले आहेत. (Tajya Batmya)

पारोळा शहरातील ओम नगर परिसरातील एका हॉटेलसमोर पत्र्याच्या शेडच्या आड शिवाजी रमेश मराठे (रा. पारोळा) हे एका कारमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याच्या तयारीत होता. त्याठिकाणी सहा सिलिंडरपैकी (Gas Cylinder) चार रिकामे व दोन सीलबंद होते. पारोळा पोलिसांनी (Parola Police) घटनास्थळी जात कारसह सिलिंडर व सर्व साहित्य असा एकूण ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भर वस्तीत वाहनांमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असते. यामुळे जीवितहानीचा मोठा धोका असतो. गेल्या दीड ते दोन महिन्यात अवैध गॅस सिलिंडरचा स्पोट व गॅस भरताना कार जळाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर हा तिसरा गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसात पुरवठा निरीक्षक विश्‍वजित गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी मराठे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT