Parola News Saam tv
महाराष्ट्र

Parola News: विद्युत तार तुटून पडली अंगावर; भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू

विद्युत तार तुटून पडली अंगावर; भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : बूधनाथ मठाजवळ भाजीपाला विक्रेत्याच्या अंगावर विद्युत तार तुटून पडल्याने त्यांचा जागीच (Death) मृत्यु झाला. ही घटना शनिवारी (१९ ऑगस्ट) संध्याकाळी साडेसातच्या (Parola) सुमारास घडली. (Latest Marathi News)

पेंढारपुर (ता. पारोळा) येथील परमेश्वर संतोष महाजन (वय ४२) हे नेहमीप्रमाणे बाजारपेठेतील  हाकेच्या अंतरावर हातगाडीवर भाजीपाला विक्रीचे दुकान लावत असतात. दरम्यान शनिवारी दुपारपासुन रिमझिम पाऊस सुरु होता. संध्याकाळी भाजीपाला विकून पैश्याचा हिशोब लावत असतांनाच अचानक मेन विजेच्या तारच्या (Electric Shock) भाग मधुनच तुटून परमेश्वर महाजन यांच्या अंगावर पडला. यावेळी नागरिकांनी सैरावैरा धावत काही विक्रेत्यांनी काठीने तार बाजुला सारली. यावेळी परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत (Jalgaon News) करण्यात आला. दरम्यान घटना घडल्यानंतर परमेश्वर महाजन यांना खाजगी डॉक्टरांकडे दाखवण्यात आले. मात्र त्यांना उपचारासाठी कुटीर रुग्णालय येथे नेण्याचे सांगण्यात आले.

अखेर विक्रेत्याचा मृत्यू 
रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांना फोन करुन घटनेविषयी माहिती देतांच रुग्णवाहिक दाखल झाली. आबा महाजन यांना कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. बाजार पेठेत भाजीपाला व किराणा साहित्य घेण्यासाठी संध्याकाळी गर्दी होत असते. परंतु शहरात दुपारपासुन रिमझिम पाऊस असल्याने संध्याकाळी गर्दी कमी होती. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. झालेल्या घटनेविषयी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast: 'जैश'च्या महिला विंगची चीफ निघाली डॉ. शाहीन, कारमध्ये ठेवायची AK-47, दिल्ली स्फोटापूर्वी अटक

Gkowing Skin Face Wash: ग्लोईंग स्किनसाठी सामान्य फेसवॉश नाही; २% सॅलिसिलिक अ‍ॅसिड असलेले फेसवॉश आहेत बेस्ट

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये धडकला ठेवीदारांचा मोर्चा

अन्याय आणि जुलूम यातूनच दहशतवाद जन्माला येतो, दिल्ली स्फोटावर अबू आझमींची प्रतिक्रिया|VIDEO

Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये 'दिल्ली' पॅटर्न, हायकोर्टाजवळ कारमध्ये स्फोट; मृतांचा आकडा वाढला

SCROLL FOR NEXT