Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaamtv

Vijay Wadettiwar News: 'अन्यायाला वाचा फोडली; 'सामना'तून फडणवीसांनाच सपोर्ट...' विजय वडेट्टीवार यांच्याकडून अग्रलेखाचे समर्थन

Maharashtra Politics: भाजपच्या घरघर अभियानाविरोधात आम्ही खरं खरं दाखवा अभियान राबवू.. असेही ते यावेळी म्हणाले.
Published on

Vijay Wadettiwar On Samana Editorial: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील अग्रलेखावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. देवेंद्र फडणवीस ‘उप’मुख्यमंत्री झाल्याने असंवेदनशील, अहंकाराचे महामेरू बनले आहेत. अशी टीका सामनामधून करण्यात आली होती. याच मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सामनातून देवेंद्र फडणवीसांनाच सपोर्ट करण्यात आल्याची खोचक टीका केली आहे.

Maharashtra Politics
Onion Export Duty : कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"'सामना'तील भाषा नीट वाचली तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सपोर्ट करण्यात आलेला आहे. सामनातून त्यांच्यावर झालेल्या अन्यायलाच वाचा फोडण्यात आली असल्याचे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले. तसेच" देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री वरून उपमुख्यमंत्री का केलं? त्यांची गुणवत्ता अभ्यास पाहता आज त्यांना मात्र कुचंबना होते आहे. त्यांना जाणून बुजून सन्मान कमी करण्याचा प्रयत्न होत आहे," असं अशी शंकाही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थिती केली.

कांदा निर्यातीचे शुल्क वाढवल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही त्यांनी यावेळी टीका केली. कांदा रस्त्यावर फेकत होते तेव्हा निर्यात केला. भाव पडतात तेव्हा चुकीचा निर्णय घेतला जातो. असे म्हणत हा निर्णय शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या हाल भावना तो निर्णय मागे घेण्याची आवश्यकता आहे.. असे ते यावेळी म्हणाले.

Maharashtra Politics
Saamana Rokhthok : शरद पवार-अजित पवार यांच्यात गुप्त भेट कशासाठी?, संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून मोठा दावा

दरम्यान, यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या घरघर अभियानावरुनही जोरदार निशाणा साधला. भाजपच्या घरघर अभियानाविरोधात आम्ही खरं खरं दाखवा अभियान राबवू.. सगळ्या योजना या काँग्रेसच्या (Congress) काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच योजनांचे प्रमाणपत्र देणे सुरू आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com