Nanded-Nagpur Highway: जेवणासाठी दोन मित्र ढाब्यावर निघाले, रस्त्यातच वाहनाचा भीषण अपघात; २ जणांचा जागीच मृत्यू

Accident News: रस्त्यावर अलेल्या खड्ड्यांमुळेच हा अपघात झाला आणि तरुणांना आपला जीव गमवावा लागला असं गावकरी आणि कुटुंबीय म्हणत आहेत.
Nanded-Nagpur Highway
Nanded-Nagpur HighwaySaam Tv

संजय सूर्यवंशी

Nanded-Nagpur Highway Accident: नांदेड ते नागपूर महामार्गावर शनिवारी रात्री तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. ट्रक, कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाल्याने दोन तरुणांचा यात जागीच मृत्यू झाला आहे. रस्त्यावर अलेल्या खड्ड्यांमुळेच हा अपघात झाला आणि तरुणांना आपला जीव गमवावा लागला असं गावकरी आणि कुटुंबीय म्हणत आहेत. (Latest Marathi News)

शेवटचा घासही खाता आलानाही

याबाबत अधिक माहिती अशी की, युनुस खान आणि शाहबाज खान अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. ते दोघेही नांदेड शहरातील खडकपुरा येथील रहिवासी होते. दोन्ही युवक शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अर्धापूर येथील धाब्यावर जेवण करण्यासाठी जात होते. मात्र जेवण करण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Nanded-Nagpur Highway
Kalyan Crime News: कल्याणमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाला नवं वळण; 2 आरोपीसह अल्पवयीन मुलंही पोलिसांच्या ताब्यात

दोन्ही तरुण नांदेड ते नागपूर महामार्गावरुन जात होते. या महामार्गावर दोन मोठमोठे खड्डे पडले आहेत. जाभरून पाटी जवळ येताच समोर ट्रक, स्कुटी आणि चारचाकी ही तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात स्कुटीवर असलेले युनुस खान आणि शाहबाज खान हवेत दूरवर फेकले गेले.

घटनेनंतर या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. मागील काही महिन्यांपासून या मार्गाचे काम संत गतीने सुरु आहे त्यामुळे एकेरी मार्गाने वाहतूक सुरु आहे. या ऐकेरी मार्गामुळे आणि खड्ड्यांमुळे अपघात घडल्याची माहिती आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

Nanded-Nagpur Highway
Khambatki Ghat Accident : 'खंबाटकी'ला दुर्घटनांचे ग्रहण, NHAI ला आमदार मकरंद पाटील खडसावणार का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com