Pune Bangalore National Highway : पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा पुणे मार्गावर खंबाटकी घाटाजवळ (khambatki ghat latest marathi news) आज (शुक्रवार) पुन्हा एकदा बोगद्यात कारवर खांबाचा अँगल पडल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत कारचे माेठे नुकसान झाले आहे. (Maharashtra News)
ही घटना रात्री उशीरा घडली आहे. चालत्या कारच्या बोनेटवर लोखंडी अँगल आदळल्याने चालक एकदम भांबावून गेला. त्याने तातडीने कार एका बाजूला घेतली. या कारच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे.
दोन दिवसांपूर्वीच एका टेंपोवर लोखंडी अँगल आदळून अपघात झाला होता. त्यानंतर प्रशासन घटनास्थळाचा सर्व्हे करेल असे स्थानिक ग्रामस्थांना वाटले हाेते परंतु तसे झाले नाही. दरम्यान या बाेगद्याचे काम साधारण सन 2000 कालावधीत झाले. त्यावेळी हे अँगल बसवले आहेत. हे काम गंजले आहेत. त्यामुळे एक एक करुन ते रस्त्यावर पडत आहेत. यामुळे अपघात हाेत आहेत.
प्रशासन काही ठाेस निर्णय घेत नसेल तर या भागातील आमदार मकरंद पाटील (mla makrand patil) यांनी एनएचएआय (NHAI) अधिकारी यांच्याशी तातडीने चर्चा करुन यावर मार्ग काढणे आवश्यक बनले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.