Parola Accident Saam tv
महाराष्ट्र

Parola Accident : माहेरी गेलेल्या पत्नीची भेट ठरली अखेरची; घरी परतताना रस्त्यातच ओढवला मृत्यू

Jalgaon News : पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथील दामु लोटन भिल (वय ३०) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दामू भिल याची पत्नी नर्मदा ही एरंडोल तालुक्यातील मौजे पिंपळकोठा येथे माहेरी गेलेली होती

Rajesh Sonwane

पारोळा (प्रतिनिधी) : पत्नी माहेरी गेली असल्याने तिला भेटण्यासाठी गेलेल्या पतीचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. घरी जाण्यासाठी पायी जात असताना त्याला भरधाव दुचाकी जोरदार धडक दिली. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पारोळा तालुक्यातील सावखेडे होळ मराठखेडेनजीक घडली आहे. या घटनेमुळे पत्नीची घेतलेली भेट अखेरची ठरली आहे. 

पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथील दामु लोटन भिल (वय ३०) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दामू भिल याची पत्नी नर्मदा ही एरंडोल तालुक्यातील मौजे पिंपळकोठा येथे माहेरी गेलेली होती, यामुळे तिला भेटण्यासाठी दामू हा २ मार्चला सकाळी १० वाजेच्या सुमारास बाभळेनाग येथून गेला होता. पत्नीची भेट घेत दिवसभर दोघांनी गप्पा मारल्या. यानंतर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पत्नीचा निरोप घेत दामू घरी जाण्यासाठी निघाला. 

दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू 

दामु भिल हा पिंपळकोठा ते बाभळेनाग गावी येण्यासाठी पायीच निघाला होता. या दरम्यान भालगाव फाटा ते मराठखेडा येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास पायी चालणाऱ्या दामू यास एरंडोलकडून पारोळाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारसायकलने जोरदार धडक दिली. यात दामू हा दूरवर फेकला गेला. यात त्याच्या डोक्यास गंभीर स्वरूपाची जखम होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. 

दुचाकीस्वार जखमी 

दरम्यान घटनेनंतर दामू भिल यास पारोळा येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. तर धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. सदर घटनेप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Manikrao Kokate : काहीतरी मोठं होणार? माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, अजित पवारांनी दौरे रद्द केले, CM फडणवीसांची घेतली भेट

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

SCROLL FOR NEXT