Manmad News : छगन भुजबळांना धक्का; मनमाड बाजार समितीच्या ६ संचालकांनी सोडली साथ

Nashik Manmad News : बाजार समितीमध्ये भुजबळ गटाचे १२ संचालक आहेत. यातील सहा संचालकांनी बाजार समितीचे सभापती दीपक गोगड यांच्या विरुद्ध अविश्वास दाखवत त्यांचे अधिकार काढण्याची उपजिल्हा निबंधकाकडे मागणी केली
Nashik Manmad News
Nashik Manmad NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. यातच मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील मोठी राजकीय घडामोड घडल्याचे पाहण्यास मिळत असून छगन भुजबळ यांचे मनमाडमधील कट्टर समर्थकांनी साथ सोडली आहे. यामुळे भुजबळांना मोठा धक्का बसला आहे. मनमाड बाजार समितीमधील निम्मे संचालकांनी भुजबळांची साथ सोडत आमदार सुहास कांदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. 

राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडी घडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यानंतर मनमाडमध्ये देखील राजकीय घडामोड घडली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी राजकीय घडामोड घडली असून छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेल्या १२ पैकी ६ संचालकांनी त्यांची साथ सोडून शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या गटात जाऊन मिळाले आहेत. 

Nashik Manmad News
Hingoli News : एसआरपीएफमध्ये भरती होण्याचे स्वप्न भंगले; रेल्वेत चढताना झाला घात

सभापतींवर दाखविला अविश्वास 

बाजार समितीमध्ये भुजबळ गटाचे १२ संचालक आहेत. यातील सहा संचालकांनी बाजार समितीचे सभापती दीपक गोगड यांच्या विरुद्ध अविश्वास दाखवत त्यांचे अधिकार काढण्याची उपजिल्हा निबंधकाकडे मागणी केली आहे. शिवाय शुक्रवारी होणाऱ्या बाजार समितीच्या सभेत गोगड यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव देखील आणण्याची तयारी आमदार कांदे गटातील संचालकांनी केली आहे. 

Nashik Manmad News
Bhandara News : भंडाऱ्यात भीषण दुर्घटना; खाणीत काम करताना ढिगाऱ्याखाली पाच कामगार दबले, दोघांचा मृत्यू

आणखी दोन संचालक येणार 

एकूण १८ सदस्य असलेल्या बाजार समितीत आमदार कांदे गटाकडे १० संचालक असून आणखी दोन संचालक त्यांच्याकडे येण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आमदार सुहास कांदे यांनी विधानसभा निवडणुकीत २०१९ साली पंकज भुजबळ आणि २०२४ साली समीर भुजबळ यांचा पराभव करून छगन भुजबळ यांना मोठा धक्का दिला होता. आता बाजार समितीत देखील भुजबळ यांना धक्का देण्याची तयारीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com