Parola Accident Saam tv
महाराष्ट्र

Parola Accident: पारोळ्याजवळ भीषण अपघात..अंत्ययात्रेला जाताना काळाची झडप; कंटेनरच्या धडकेत ३ ठार, २१ गंभीर

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : पारोलाजवळ बायपास रस्त्यावर कंटेनरने प्रवाशी वाहतूक करणाऱ्या पीकअपला जोरदार धडक दिली. या भीषण (Accident) अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जण गंभीर (Jalgaon) जखमी झालेत आहेत. सर्व जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. (Breaking Marathi News)

बोळे (ता. पारोळा) येथून चिलाणे (ता. शिंदखेडा) येथे अंत्यसंस्कारासाठी काहीजण पिकअप गाडीने जात होते. या गाडीत २२ महिला- पुरुष बसलेले होते. दरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर समोरून येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने पीकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रेखा बाई गणेश  कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०), चंदनबाई नानाभाऊ गिरासे (वय ६५) यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमींना रुग्णालयात दाखल

सदर अपघातात भरत गिरासे, रणजित गिरासे, राजेश कोळी, भिमकोर गीरासे, भुराबाई गीरासे,चंदनबाई गीरासे, रेखा बाई गीरासे, नाना गीरासे, भटा गीरासे, सुनीता गीरासे ,धुराबाई गीरासे ,रेखाबाई कोळी,अजतसिंग गीरासे, सय्यद लीहायत, हिराबाई गीरासे, भिमकोरबाई गीरासे, भगवान गिरासे,  रणजितसिंग गीरासे, रुपासिंग गीरासे, दश्याबाई गिरासे व राजेबाई कोळी असे एकूण २२ जण गंभीर जखमी झालेत. इतरांवर प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या[घाताची माहिती मिळताच कुटीर रुग्णालयास गर्दी झाली होती. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT