Pachora News Saam tv
महाराष्ट्र

Pachora News: हरिनाम सप्ताहाचा प्रसाद घेण्यासाठी जाताना घात; रेल्वे रूळ ओलांडताना दोघांचा मृत्यू

Jalgaon News : हरिनाम सप्ताहाचा प्रसाद घेण्यासाठी जाताना घात; रूळ ओलांडताना दोघांचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

नांद्रा (जळगाव) : शेजारच्या गावात हरिनाम सप्ताह सुरु होता. या सप्ताहांतर्गत प्रसाद घेण्यासाठी दुसखेडा (ता. पाचोरा) गावातील काही (Pachora) नागरिक जात होते. मात्र प्रसाद घेण्यापूर्वीच काळाने घाला घातला. रेल्वे (Railway) रूळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला. हि घटना रविवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात प्रसादासाठी दुसखेडा येथील काही ग्रामस्थ व महिला भाविक रेल्वेमार्गाजवळून जात होते. दरम्यान दुसखेडा गावाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना रत्नाबाई माधव पाटील (वय ५९) व अशोक झेंडू पाटील (वय ६०) यांना भरधाव रेल्वेची जोरदार धडक बसली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

सोबतच्या नागरिकांना धक्का 

प्रसादासाठी सोबत जात असताना दोघांच्या मृत्यूने सोबत जात असलेल्या नागरिकांना धक्का बसला. घटना गावात कळताच ग्रामस्थांनी (Jalgaon News) घटनास्थळी धाव घेतली. मृतातील अशोक पाटील हे मूळचे पहाण (ता. पाचोरा) येथील रहिवासी असून, कुरंगी शिवारातील शेती करण्यासाठी दोन वर्षांपासून ते दुसखेडा येथे वास्तव्यास होते. घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT