Surabhi Jayashree Jagdish
बाईक चालवून आल्यानंतर लगेच धुण्यास सुरुवात करू नये. इंजिन, सायलेन्सर आणि ब्रेक पूर्णपणे थंड होईपर्यंत थांबावं. यासाठी ठरावीक मिनिटं नसतात कारण प्रत्येक बाईकचं तापमान वेगवेगळ्या वेळेत कमी होते.
इंजिन गरम असताना त्यावर थंड पाणी टाकल्यास तापमानात अचानक बदल होतो. त्यामुळे धातूच्या काही भागांवर ताण येऊन नुकसान होण्याची शक्यता असते. गरम सायलेन्सरवर पाणी पडल्यास पाण्याचे डागही पडू शकतात.
बाईक धुण्यासाठी सामान्य तापमानाचं स्वच्छ पाणी वापरावं. पाणी खूप गरम किंवा खूप थंड नसावं. बाईकवरील माती काढण्यासाठी कमी दाबाने पाणी सोडावं आणि स्वच्छतेसाठी सौम्य साबण वापरावा.
बाईक धुतल्यानंतर मऊ आणि स्वच्छ कापडाने ती व्यवस्थित पुसून घ्यावी. बाईकच्या छोट्या भागांमध्ये आणि इलेक्ट्रिकल जोडण्यांजवळ पाणी साचले नाही ना, हे तपासावं. गाडी चालवण्यापूर्वी ब्रेक व्यवस्थित काम करत आहेत की नाही, हे कमी वेगात तपासावं.
बाईक धुण्यासाठी सकाळची किंवा संध्याकाळची वेळ निवडू शकता. कडक उन्हात बाईक धुतल्यास पाणी आणि साबण लवकर वाळून पेंटवर डाग पडू शकतात. त्यामुळे शक्यतो सावलीत आणि बाईक थंड झाल्यानंतरच ती धुवावी.
बाईकचं इंजिन आणि सायलेन्सर गरम असताना त्यावर थंड पाणी टाकणं टाळावं. अचानक तापमान बदलल्यामुळे गरम भागांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे बाईक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच पाणी टाकून धुवावी.