Bhama Askhed Dam: भामा आसखेड धरण अखेर १०० टक्के भरले; दमदार पावसाने पाणी पातळीत वाढ

Pune News : भामा आसखेड धरण अखेर १०० टक्के भरले; दमदार पावसाने पाणी पातळीत वाढ
Bhama Askhed Dam
Bhama Askhed DamSaam tv

खेड (पुणे) : मागील काही दिवस पावसाने दडी मारल्यानंतर पुणे, पिंपरी- चिंचवड परिसरात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे (Khed) खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरण १०० टक्के भरले आहे. (Live Marathi News)

Bhama Askhed Dam
Ramdas Athawale News: एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री राहणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान

यावर्षी पावसाची उशिरा सुरुवात झाली. तर मागील एक ते दीड महिना तुरळक स्वरुपाचा पाऊस वगळता (Heavy Rain) पावसाने दडी मारली होती. यामुळे भामा आसखेड धरणातील पाणीसाठा गेले कित्येक दिवस ८३ ते ८४ टक्क्यांवर स्थिरावला होता. मात्र मागील दोन दिवस दमदार पडत असलेल्या पावसाने भामा- आसखेड धरण फुल झाले आहे. 

Bhama Askhed Dam
Jalna News: कोळपणीचे काम सुरु असतानाच दोन्ही बैलांचा मृत्यू; तारात विदूत प्रवाह उतरला असल्याने लागला शॉक

पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह चाकण औद्योगिक क्षेत्र आणि आळंदी शहराला पाणी पुरवठा करणारे खेड तालुक्यातील भामा आसखेड  धरण अखेर १०० टक्के भरले. यामुळे धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या सर्व शेतकरी, उद्योजक व सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com