Psychology Facts : कधी कधी एखादी घटना आधीही घडल्याचा भास का होतो? जाणून घ्या ‘डेजा व्हू’मागचं वैज्ञानिक कारण

THE SCIENCE OF DEJA VU : एखादी नवी गोष्ट घडत असताना ती आधीही घडल्याचा किंवा पाहिल्याचा जो भास होतो. आपल्या मेंदूच्या माहिती प्रोसेस करण्याच्या पद्धतीतील एका छोट्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा आठवणींच्या संभ्रमामुळे हा अनुभव येतो.
why does deja vu happen in the human brain
why does deja vu happen in the human brain saam tv
Published On: 

कधी एखाद्या अनोळखी ठिकाणी गेल्यावर अचानक हे ठिकाण आधीही पाहिल्याची जाणीव होते? एखाद्या व्यक्तीशी पहिल्यांदाच बोलत असतानाही हा संवाद यापूर्वी झाल्यासारखा वाटतो? किंवा एखादी घटना घडत असताना अगदी असाच प्रसंग आपल्या आयुष्यात पूर्वी घडून गेल्याची भावना निर्माण होते? अशा अनुभवाला मानसशास्त्र आणि विज्ञानाच्या भाषेत ‘डेजा व्हू’ (DEJA VU) असे म्हणतात. फ्रेंच भाषेतील या शब्दाचा अर्थ ‘आधीच पाहिलेले’ असा होतो.

नेमकं डेजा व्हू म्हणजे काय?

डेजा व्हू ही मेंदूशी संबंधित एक रंजक अनुभूती आहे. प्रत्यक्षात एखादा प्रसंग पहिल्यांदाच घडत असतो, मात्र मेंदूला तो आधी अनुभवल्याची जाणीव होते. विशेष म्हणजे, हा अनुभव येताना संबंधित व्यक्तीला आपण हा प्रसंग यापूर्वी नेमका कधी आणि कुठे अनुभवला होता, हे आठवत नाही. त्यामुळे काही क्षणांसाठी आपल्याला आश्चर्य वाटते.

why does deja vu happen in the human brain
Hair Care Tips : केस धुताना तुम्हीही या ७ चुका करता का? आताच बदला सवय अन्यथा..

मेंदूमध्ये नेमकं काय घडतं?

तज्ज्ञांच्या मते, डेजा व्हूचा संबंध मेंदूतील स्मरणशक्ती आणि माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या भागांशी असू शकतो. मेंदू नवीन अनुभव आणि जुन्या आठवणी यांची तुलना करत असतो. या प्रक्रियेत काही क्षणांसाठी गोंधळ निर्माण झाल्यास सध्याचा अनुभव पूर्वी घडल्यासारखा वाटू शकतो.

काही संशोधनांनुसार, मेंदूतील टेम्पोरल लोब आणि हिप्पोकॅम्पस या भागांचा स्मरणशक्तीशी संबंध असल्याने डेजा व्हूच्या अनुभूतीत त्यांची भूमिका असू शकते. मात्र या अनुभवामागील नेमकी यंत्रणा अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही.

why does deja vu happen in the human brain
Kitchen Tips : किचनमधील या पाच वस्तू किती दिवसांनी बदलल्या पाहिजेत? आरोग्याच्या दृष्टीने घ्या काळजी

डेजा व्हू होण्यामागची कारणं कोणती?

थकवा, झोपेची कमतरता, मानसिक ताण आणि मेंदूवर येणारा अतिरिक्त ताण यांचा अशा अनुभवांशी संबंध असू शकतो. विशेषतः तरुण आणि निरोगी व्यक्तींनाही अधूनमधून डेजा व्हूचा अनुभव येऊ शकतो.

सामान्यतः काही सेकंद टिकणारा डेजा व्हू हा चिंतेचा विषय नसतो. मात्र वारंवार असे अनुभव येत असतील आणि त्यासोबत चक्कर येणे, गोंधळ किंवा शुद्ध हरपण्यासारखी लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.