Kitchen Tips : किचनमधील या पाच वस्तू किती दिवसांनी बदलल्या पाहिजेत? आरोग्याच्या दृष्टीने घ्या काळजी

kitchen hygiene tips : रोज जेवणात वापरल्या जाणाऱ्या किचनमधील काही वस्तूंची विशिष्ट मुदत संपल्यानंतर त्या बदलणे आरोग्यासाठी खूप गरजेचे असते. अशाच महत्त्वाच्या ५ वस्तू आणि त्यांच्या बदलाची योग्य वेळ जाणून घ्या.
kitchen items replacement frequency for safe cooking in Marathi
kitchen items replacement frequency for safe cooking in Marathisaam tv
Published On: 

स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू आपल्या आरोग्याशी थेट संबंधित असतात. भाजी चिरण्यापासून ते अन्न साठवण्यापर्यंत आपण स्पंज, चॉपिंग बोर्ड, नॉन-स्टिक पॅन, किचन टॉवेल आणि प्लास्टिकच्या डब्यांचा नियमित वापर करतो. मात्र, या वस्तू किती काळ वापराव्यात आणि त्या कधी बदलणे आवश्यक आहे, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. योग्य वेळी या वस्तू न बदलल्यास त्यावर जंतू वाढण्याची किंवा अन्न दूषित होण्याची शक्यता असते.

किचन स्पंज

भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरला जाणारा स्पंज सतत ओला राहत असल्याने त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. त्यामुळे स्पंज नियमित स्वच्छ करून पूर्णपणे वाळवणे आवश्यक आहे. साधारणपणे एक ते दोन आठवड्यांत स्पंज बदलावा. त्यातून दुर्गंधी येत असल्यास किंवा तो खराब झाल्यास त्वरित बदलावा.

kitchen items replacement frequency for safe cooking in Marathi
Child Habits - जेवताना मोबाईल दिला नाही तर मुले जेवणच सोडतात? 'या' सोप्या उपायांनी बदला मुलांची सवय

चॉपिंग बोर्ड

भाज्या, फळे आणि मांस कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चॉपिंग बोर्डवर चाकूच्या खोल खुणा पडतात. या खाचांमध्ये अन्नाचे कण आणि जंतू अडकू शकतात. बोर्डवर खोल ओरखडे, तडे किंवा बुरशी दिसल्यास तो बदलावा. कच्चे मांस आणि भाज्यांसाठी शक्यतो वेगवेगळे बोर्ड वापरावेत.

नॉन-स्टिक पॅन

नॉन-स्टिक पॅनचा वापर करताना धातूची झारी किंवा चमचा वापरणे टाळावे. त्यामुळे त्यावरील कोटिंग खराब होऊ शकते. पॅनचे कोटिंग उखडलेले असेल, खोल ओरखडे पडले असतील किंवा पृष्ठभाग खराब झाला असेल तर तो बदलणे योग्य ठरते.

kitchen items replacement frequency for safe cooking in Marathi
Winter Beauty Tips : थंडीत चेहरा काळवंडतोय? त्वचेचा नैसर्गिक सुंदरता टिकवण्यासाठी करा या गोष्टी

किचन टॉवेल

हात पुसण्यासाठी आणि स्वयंपाकघरातील ओटा स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे टॉवेल वारंवार ओले होतात. त्यामुळे त्यावर जंतू वाढू शकतात. टॉवेल रोज बदलून स्वच्छ धुवावा आणि उन्हात पूर्णपणे वाळवावा. दुर्गंधी किंवा डाग कायम राहिल्यास नवीन टॉवेल वापरावा.

प्लास्टिकचे डबे

अन्न साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या डब्यांना तडे गेले असतील, ओरखडे पडले असतील किंवा त्यांचा रंग आणि वास बदलला असेल तर ते बदलणे आवश्यक आहे. गरम अन्न साठवण्यासाठी केवळ त्यासाठी सुरक्षित असल्याचे नमूद केलेले डबेच वापरावेत. मायक्रोवेव्हमध्ये वापरण्यापूर्वी डब्यावर दिलेल्या सूचना तपासाव्यात.

स्वयंपाकघरातील या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास स्वच्छता राखण्यास आणि अन्नातून होणारे संसर्ग टाळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या वस्तूंची नियमित तपासणी करा आणि गरजेनुसार त्या बदला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.