Winter Beauty Tips : थंडीत चेहरा काळवंडतोय? त्वचेचा नैसर्गिक सुंदरता टिकवण्यासाठी करा या गोष्टी

Winter Skin Care Tips: थंडीच्या दिवसांत हवेतील कोरडेपणामुळे चेहऱ्याचा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि त्वचा निस्तेज किंवा काळवंडलेली दिसू लागते. पण काळजी करू नका, दैनंदिन आयुष्यात काही सोपे बदल करून तुम्ही तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक आणि सुंदरता सहज टिकवून ठेवू शकता.
best winter skin care tips for glowing face at home
best winter skin care tips for glowing face at home saam tv
Published On: 

हिवाळा सुरू झाला की वातावरणातील थंडी आणि कोरडेपणाचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो. अनेकांना या दिवसांत चेहरा निस्तेज दिसणे, त्वचा कोरडी पडणे, काळवंडणे आणि चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कमी होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे थंडीत चेहऱ्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

थंडीत चेहरा काळवंडण्यामागे काय कारणे आहेत?

हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी, खरखरीत आणि निस्तेज दिसू लागते. याशिवाय थंडीतही सूर्याची अतिनील किरणे त्वचेवर परिणाम करतात. सूर्यप्रकाशाच्या संपर्कामुळे टॅनिंग आणि त्वचेवर काळे डाग निर्माण होऊ शकतात.

best winter skin care tips for glowing face at home
Stress And Blood Pressure: वयाच्या २०-३० व्या वर्षीच बीपी वाढतोय? तुमच्या रोजच्या 'या' ५ सवयी ठरतायेत घातक

चेहऱ्याची नैसर्गिक सुंदरता टिकवण्यासाठी काय कराल?

चेहरा मॉइश्चराइज ठेवा

चेहरा धुतल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

सनस्क्रीन वापरा

हिवाळ्यातही बाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा. गरजेनुसार पुन्हा वापरा.

कोमट पाण्याने चेहरा धुवा

खूप गरम पाणी वापरल्याने त्वचेचा नैसर्गिक तेलकटपणा कमी होऊ शकतो. त्यामुळे चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

पुरेसे पाणी प्या

शरीरातील पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. नियमित पाणी पिण्यामुळे शरीराचे योग्य हायड्रेशन राखण्यास मदत होते.

best winter skin care tips for glowing face at home
Healthy Diet : हाडांच्या मजबुतीसाठी नाचणी ठरतेय वरदान! छोट्याशा दाण्यात कॅल्शियमचा मोठा खजिना

संतुलित आहार घ्या

आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक मिळतात.

त्वचेवर प्रयोग करणे टाळा

वारंवार स्क्रब करणे, लिंबाचा रस किंवा इतर तीव्र घरगुती उपाय चेहऱ्यावर लावणे टाळा. यामुळे त्वचेची जळजळ आणि काळे डाग वाढू शकतात.

चेहऱ्याची काळजी घेणे का महत्त्वाचे?

हिवाळ्यात त्वचेची योग्य निगा राखल्यास कोरडेपणा, निस्तेजपणा आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत होते. मात्र चेहऱ्यावर अचानक काळे डाग दिसू लागल्यास किंवा रंगात सतत बदल होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टीप : सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सपेक्षा नियमित स्किन केअर, योग्य आहार आणि सूर्यकिरणांपासून संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.