Child Habits - जेवताना मोबाईल दिला नाही तर मुले जेवणच सोडतात? 'या' सोप्या उपायांनी बदला मुलांची सवय

Children eating habits : मुलांना जेवताना मोबाईलची सवय लागल्यामुळे अनेक पालक त्रस्त असतात. स्क्रीनशिवाय मुले जेवायला तयार होत नाहीत, ही आजच्या काळातील एक मोठी समस्या बनली आहे.
Mobile addiction in children
Mobile addiction in childrensaam tv
Published On: 

आजच्या डिजिटल युगात लहान मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक मुलांना जेवताना मोबाईलवर व्हिडीओ किंवा कार्टून पाहण्याची सवय लागली आहे. मोबाईल हातात दिल्याशिवाय मुले जेवायला तयार होत नाहीत. त्यामुळे पालकांसमोर मुलांची ही सवय कशी बदलावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, काही सोप्या उपायांच्या मदतीने मुलांना मोबाईलशिवाय जेवण्याची सवय लावता येऊ शकते.

मुलांना गोष्टी सांगण्याची सवय लावा

पूर्वी आजी-आजोबा मुलांना जेवताना वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. हीच परंपरा पुन्हा सुरू करा. मुलांना आवडतील अशा रंजक आणि मजेदार गोष्टी सांगा. त्यामुळे त्यांचे लक्ष हळूहळू मोबाईलच्या स्क्रीनवरून हटण्यास मदत होईल.

Mobile addiction in children
Winter Beauty Tips : थंडीत चेहरा काळवंडतोय? त्वचेचा नैसर्गिक सुंदरता टिकवण्यासाठी करा या गोष्टी

संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवण करा

मुलांना एकट्याने जेवायला बसवण्याऐवजी संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवण्याची सवय लावा. जेवताना गप्पा मारा, मुलांना त्यांच्या दिवसाबद्दल विचारा आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवा. यामुळे मुलांचे लक्ष मोबाईलऐवजी कुटुंबातील संवादाकडे वळेल.

पालकांनीही जेवताना मोबाईल टाळावा

लहान मुले पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे आई-वडील सतत मोबाईल वापरत असतील, तर मुलांकडूनही तीच सवय आत्मसात केली जाऊ शकते. म्हणून जेवणाच्या वेळी संपूर्ण कुटुंबाने मोबाईल बाजूला ठेवण्याचा नियम करा.

आवडते खेळणे जवळ ठेवा

मुलांना आवडणारे खेळणे जेवणाच्या वेळी जवळ ठेवा. त्यामुळे त्यांचे लक्ष मोबाईलऐवजी खेळण्याकडे वळू शकते. मात्र, खेळण्यामुळे जेवणात अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या.

Mobile addiction in children
Health News : मधुमेहाचा मेंदूवरही गंभीर परिणाम! अल्झायमरचा धोका, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

जेवण आकर्षक पद्धतीने वाढा

मुलांना रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या आकारातील पदार्थ आवडतात. पोळीला स्माइली, तारा किंवा टेडी बेअरचा आकार द्या. तसेच रंगीत भाज्या आणि फळांचा वापर करून ताट आकर्षक पद्धतीने सजवा. यामुळे मुलांची जेवणातील रुची वाढू शकते.

जेवणाच्या वेळेआधी पोटभर खाऊ देऊ नका

जेवणाच्या अगोदर मुलांनी चिप्स, बिस्किटे किंवा इतर पॅकेटमधील पदार्थ खाल्ले असतील, तर त्यांची भूक कमी होऊ शकते. त्यामुळे जेवणाच्या वेळेआधी अनावश्यक खाऊ देणे टाळा आणि मुलांच्या भुकेनुसार योग्य आहार द्या.

मोबाईलची सवय बदलताना संयम महत्त्वाचा

मुलांची मोबाईलवर अवलंबून राहण्याची सवय एका दिवसात बदलत नाही. त्यामुळे त्यांच्यावर रागावण्याऐवजी प्रेमाने आणि सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेवणाची वेळ आनंददायी बनवून मुलांना हळूहळू मोबाईलशिवाय जेवण्याची सवय लावता येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.