Health News : मधुमेहाचा मेंदूवरही गंभीर परिणाम! अल्झायमरचा धोका, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

how diabetes affects brain health : मधुमेहाचा केवळ शरीरावरच नव्हे तर मेंदूवरही अत्यंत गंभीर परिणाम होतो. ज्यामुळे विचार करण्याची क्षमता मंदावते. तसेच, अनियंत्रित साखरेच्या पातळीमुळे भविष्यात अल्झायमरसारखा धोकादायक आजार जडण्याची शक्यता वाढते.
how diabetes affects brain health
how diabetes affects brain health saam tv
Published On: 

मधुमेह हा केवळ शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवणारा आजार नाही, तर त्याचा परिणाम मेंदूच्या आरोग्यावरही होऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष नव्या संशोधनातून समोर आला आहे. टाइप-२ मधुमेह असलेल्या व्यक्तींना अल्झायमर आजाराचा धोका मधुमेह नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत ५३ टक्क्यांनी अधिक असू शकतो?

४० अभ्यासांच्या विश्लेषणातून महत्त्वाचा निष्कर्ष

ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठाच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. यासाठी एकूण ४० संशोधनांचा पद्धतशीर आढावा आणि मेटा-विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणातून टाइप-२ मधुमेह आणि अल्झायमर यांच्यातील संबंध अधोरेखित करण्यात आला आहे. या संशोधनानुसार, टाइप-२ मधुमेह असलेल्या प्रत्येक एक हजार व्यक्तींचा एका वर्षासाठी विचार केल्यास सरासरी ४.७ जणांना अल्झायमर होण्याची शक्यता असल्याचे आढळले.

how diabetes affects brain health
Healthy Diet : हाडांच्या मजबुतीसाठी नाचणी ठरतेय वरदान! छोट्याशा दाण्यात कॅल्शियमचा मोठा खजिना

अल्झायमर म्हणजे नेमके काय?

अल्झायमर हा मेंदूशी संबंधित आजार असून, यामध्ये व्यक्तीची स्मरणशक्ती हळूहळू कमी होऊ लागते. दैनंदिन कामे विसरणे, परिचित व्यक्तींची नावे आठवण्यात अडचण येणे, निर्णयक्षमता कमी होणे आणि विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

how diabetes affects brain health
Hair Care: केसगळती आणि कोरड्या केसांच्या समस्येवर जास्वंदाच्या तेलाचा घरगुती उपाय; असे बनवा नैसर्गिक हेअर ऑईल

मधुमेह नियंत्रणात ठेवणे का महत्त्वाचे?

मधुमेहाचा शरीरातील चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे दीर्घकाळ रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर राहिल्यास विविध आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. नव्या संशोधनामुळे मधुमेहाच्या उपचारांमध्ये मेंदूचे आणि स्मरणशक्तीचे आरोग्य जपण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मधुमेहाकडे दुर्लक्ष करू नका. नियमित आरोग्य तपासणी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांना महत्त्व द्या. स्मरणशक्तीत किंवा विचार करण्याच्या क्षमतेत बदल जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.

टीप : या संशोधनातून मधुमेह आणि अल्झायमर यांच्यातील संबंध दिसून आला आहे. याचा अर्थ मधुमेह असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अल्झायमर होईल, असा नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.