Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : नोकरीचे आमिष देऊन पाच लाखांत फसवणूक

Rajesh Sonwane

पाचोरा (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील भूमि अभिलेख विभागात जागा निघाल्या असून, तेथे नोकरी लावून देण्याचे आमिष (Jalgaon) दाखविले. सामान्य कुटुंबातील व्यक्ती असल्याने नोकरीच्या आमिषाला बाली पडला आणि पाच लाख ४० हजार रुपयात (Fraud) फसवणूक झाली. या प्रकरणी अमळनेर येथील अमीन पिंजारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

ट्रकचालक इकबाल पिंजारी यांनी फसवणुकीबाबत तक्रार दिली. अमळनेर येथील तांबापुरा भागात राहणारा पत्नीचा मावस भाऊ अमीन पिंजारी याने घरी येऊन मुलास जिल्हा भूमिलेख विभागात नोकरी लावून देतो; असे आमीष दाखविले. यासाठी मार्च ते जून २०२१ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी करून पाच लाख ४० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. वेळोवेळी पैसे जमा केले. परंतु अडीच वर्षे झाले तरी नोकरी मिळाली नाही.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसात घेतली धाव 

नोकरी मिळत नसल्याने पैसे परत देण्याबाबत अमीनकडे मागणी केली. पैशांची मागणी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी अमीन पिंजारीविरोधात फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक योगेश गणगे तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT