Pachora Crime Saam tv
महाराष्ट्र

Pachora Crime : घराबाहेर बसून टवाळक्या करणाऱ्यांना वृद्धेने हटकले; रात्री घरात घुसून केले भयानक कृत्य, तिघेही पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon News : गावातील काही टवाळखोर मुले घराबाहेरच बसून त्रास देत टिंगल करायचे. यावरून जनाबाई यांनी अनेकदा पिटाळून लावायची. जनाबाई नेहमी शिव्या देत असल्याच्या कारणावरून तिघांचे जनाबाईसोबत भांडण झाले होते

Rajesh Sonwane

जळगाव : दिवसभर घराच्या बाहेर बसून टवाळखोर करत, मोबाईलवर जोरजोरात गाणे वाजवायचे. यामुळे वृद्धा या टवाळखोर तरुणांना हटकत होती. यातून थोडा वाद झाला. मात्र रात्रीच्या सुमारास मागच्या दरवाजाने घरात प्रवेश करत वृद्धेला जीवे मारले. यानंतर अंगावरील दागिने ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील शेवाळे या गावात घडली होती. घटनेतील मारेकर्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथील जनाबाई महारू पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. तर साहील मुकद्दर तडवी (वय २१), राकेश बळीराम हातांगडे (वय २१) व राजेश अनिल हातांगडे (वय १८) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान हे तिघे संशयितांसह गावातील काही टवाळखोर मुले जनाबाईच्या घराबाहेरच बसून त्रास देत टिंगल करीत असायचे. यावरून जनाबाई यांनी अनेकदा पिटाळून लावायची. जनाबाई नेहमी शिव्या देत असल्याच्या कारणावरून तिघांचे जनाबाईसोबत भांडण झाले होते.

रात्री घरात प्रवेश करत केली हत्या 

याच रागातून तिघांनी ५ जूनला जनाबाईच्‍या घरात मागील दाराने प्रवेश केला. यानंतर जनाबाई यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केला. यानंतर त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. याबाबत जनाबाईच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरवातीला बाहेरील चोरट्यांनी खून केल्याचा संशय होता. 

चौकशीत तिघेही अडकले 

दरम्यान पोलिसांनी घटनेचा तपास करताना गावातील काही टवाळ्या करणाऱ्या मुलांना हेरत चौकशी केली. यात तिघांची माहिती घेत चौकशी केली असता गुन्ह्याचा उलगडा झाला. यानंतर पोलिसांनी साहिल तडवी, राकेश हातंगडे व राजेश हातांगडे यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: 27 ऑक्टोबरपासून 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; मंगळ ग्रह करणार स्वतःच्याच राशीत प्रवेश

Maharashtra Live News Update: ५ दिवस पुन्हा अवकाळी, उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी

Success Story: जर्मनीतील नोकरी सोडली, भारतात रिसेप्शन म्हणून काम केले, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS पूजा यादव यांचा प्रवास

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

SCROLL FOR NEXT