Jalgaon Accident News
Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News: पहाटेचा थरार..बसने उतरले अन्‌ पाय गमावले; चौकात उभ्‍या चौघांना पिकअपने उडविले

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : पाचोरा येथील महाराणा प्रताप चौकात पहाटेच्‍या सुमारास मुंबईकडुन येणाऱ्या पिकअप गाडीने मंदीराच्या ओट्यावर बसलेल्यांना धडक दिली. या (Accident) अपघातात चौघे (Pachora) जखमी झाले आहेत. यात दोन जणांच्‍या दोन्‍ही पायांचे तुकडे पडले आहेत. (LIve Marathi News)

मुंबईहून बुलढाणा येथे सफरचंद, किवी, मोसंबीने भरलेली पिकअप मालवाहतूक गाडीने आज (१२ मे) पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबईकडुन येत असतांना चौकातील दत्त मंदीरच्या ओट्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ओट्यावर बसलेल्या दोघांच्या चारही पायाचे तुकडे होवुन जागीच पडले. अपघातानंतर एकच हाहाकार उडाला. यानंतर जखमींना उपचारासाठी हॉस्‍पीटलमध्‍ये भरती करण्यात आले. या अपघातात विनोद बारकु पाटील (वय ३५), कुंदन सुनिलसिंग परदेशी (वय १७, रा. पुनगाव), अमोल वाघ (वय २६, रा. पाचोरा), वसंत भाईदास पाटील (वय ४२) हे जखमी झाले आहेत. यात विनोद पाटील व वसंत पाटील यांचे दोघांच्‍या पायाचे जागेवर तुकडे पडले होते.

लग्नासाठी आले आणि पाय गमवुन बसले

दरम्यान वसंत पाटील हे आज सकाळीच लक्झरीने पाचोरा येथे आले होते. चौकात उतरले आणि चहा घेतल्यावर पत्ता विचारत अमोल वाघ यास उठून स्वतः नातेवाईकांची वाट बघत उभे होते. याचवेळी अचानक गाडीने धडक दिल्‍याने त्यांचे दोघे पाय उडवले. तसेच अपघातात जखमी विनोद पाटील हा घरातील कर्ता पुरुष आहे. त्याचेही दोघे पाय निकामी झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Nirupam : त्यावेळी माझ्यासोबत दगाफटका...; शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताच संजय निरुपम यांनी सांगितला तो किस्सा

Special Report : Ajit Pawar यांना पुतण्या Yugendra Pawar देणार आव्हान?

Today's Marathi News Live : अमोल किर्तीकर यांच्या पत्नीचाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अर्ज दाखल

Special Report : Sharad Pawar यांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत फोडला घाम!

Special Report | काळ आला होता पण...हेलिकॉप्टर दुर्घटनेत अंधारे बचावल्या Jayant Patil सुद्धा सुखरूप

SCROLL FOR NEXT