jalgaon zilha parishad 
महाराष्ट्र

मुक्‍या बापाने मुलासाठी अधिकाऱ्यासमोर हात जोडले; दोन वर्षांपासून पगार रखडलेला

मुक्‍या बापाने मुलासाठी अधिकाऱ्यासमोर हात जोडले; दोन वर्षांपासून पगार रखडलेला

Rajesh Sonwane

जळगाव : शाळेत शिपाई असताना दोन वर्षांपासून पगार होत नाही. त्‍यात कॅन्‍सरने ग्रासले. याबाबत वारंवार तक्रार करून देखील माध्‍यमिक शिक्षण विभागाकडून दखल घेतली नाही. यामुळे आज आपल्‍या कॅन्‍सरग्रस्‍त मुलाला न्याय मिळावा; या मागणीसाठी वडीलांनी जिल्हा परिषदेत शिक्षण उपसंचालकांसमोर येवून हात जोडून विनंती करणाऱ्या मुक्या बापाला पाहून यंत्रणेला पाझर फुटला. शिक्षण उपसंचालकांनी न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. (jalgaon-news-zp-father-joined-hands-with-the-officer-for-the-son-no-Salary-stagnant-for-two-years)

जळगाव शहरातील राजेंद्र वामन जोशी यांची २०१९ मध्ये नूतन मराठा महाविद्यालयाच्‍या हातेड (ता. चोपडा) येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात बदली झाली. बदली झाल्‍याने जोशी रुजूही झाले. परंतु, २०१९ पासून आजपर्यंत पगारच मुख्याध्यापकाने काढलेला नाही. याबाबत जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमिक शिक्षणाधिकारी यांच्‍याकडे तक्रारी केला. परंतु, दोन वर्षांपासून केलेल्या तक्रारींची दखल माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेतली गेली नाही. अशात जोशी यांना कॅन्सरने ग्रासले. पगार नाही त्‍यात आजार यातही जोशी यांचा लढा सुरू आहे.

मुका बाप ओढतोस गाडा

राजेंद्र जोशी यांचा दोन वर्षांपासून पगार बंद त्‍यात कॅन्‍सरचा इलाज सुरू आहे. कमाविणारे कोणीही नाही. यामुळे म्‍हातारा मुका बाप प्रपंच चालविण्यासाठी सॉ मिलमध्‍ये काम करत आहे. यातून जे मिळेल त्‍यावर परिवाराचा गाडा हाकत आहेत. हाच मुका बाप मुलासाठी जिल्‍हा परिषदेची पायरी चढतो व शिक्षण उपसंचालकांसमोर हात जोडून विनंती करतो.

अन्‌ त्‍यांनी कैफियत ऐकूण दिले आदेश

माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी राजेंद्र जोशी यांचा प्रश्‍न मांडण्यासाठी वार्षिक तपासणीनिमित्ताने जिल्‍हा परिषदेत आलेले शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्‍यासमोर राजेंद्र जोशी यांच्‍या मुक्‍या बापाला उभे केले. मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आलेला त्‍या बापाने शिक्षण उपसंचालकांसमोर हात जोडून न्याय मिळण्याची मागणी केली. मुक्या बापाला पाहून शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकार्‍यांना या प्रकरणात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधितास पगार मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. अशाच प्रकारे जळगावातील उपशिक्षक नरेंद्र साहेबराव पाटील यांचाही अर्ज प्रलंबित होता. त्यांनीही भेट घेतली असता, अर्जावर कार्यवाही करण्याचे आश्‍वासन शिक्षण उपसंचालकांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: सोन्याचे दर ₹८५००० पर्यंत घसरणार? आता खरेदी करावं की नाही

Viral Video : वऱ्हाड निघालं रेल्वेनं! लग्नाचा थाट असा की थेट ट्रेनचा कोच बुक केला, डान्स-गाणी अन् बरंच काही....; VIDEO व्हायरल

International Film Festival: मराठी अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलबाला, 'द मशरूमस' साठी मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

LPG Cylinder: LPG च्या नियमात मोठा बदल, फक्त 'हे' कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर; सर्वसामान्यांना दिलासा

Maharashtra News Live Update: रूपाली चाकणकर सुनेत्रा पवारांच्या पोटनिवडणुकीच्या अर्ज भरायच्या कार्यक्रमात अनुपस्थित

SCROLL FOR NEXT