हौसेला नाही मोल! कोल्हापुरात जावयासाठी बनवली दीड किलो वजनी चांदीची चप्पल

Silver Kolhapuri Chappals: कोल्हापूरमध्ये एक अनोखी परंपरा पाहायला मिळाली आहे. एका सासऱ्यांनी आपल्या लाडक्या जावयाला दीड किलो वजनाची चांदीची कोल्हापुरी चप्पल भेट दिली. ही आलिशान आणि पारंपरिक चप्पल आता संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली आहे.
Silver Kolhapuri  Chappals:
Silver Kolhapuri Chappals:saam tv
Published On
Summary
  • कोल्हापुरात जावयासाठी दीड किलो वजनाची चांदीची चप्पल तयार करण्यात आली.

  • पारंपरिक कोल्हापुरी पायतानाला चांदीचा आकर्षक स्पर्श देण्यात आला.

  • या अनोख्या भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

अधिकचा महिना म्हणजे जावयांसाठी लयलूट.अनेक सासरे आपल्या लाडक्या जावयांना नवीन कपड्यांपासून ते सोन्या-चांदीचे दागिने गिफ्ट देत असतात. मात्र कोल्हापूरच्या जावयाला सासऱ्यानं दिलेलं गिफ्ट पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काय आहे हे गिफ्ट पाहूयात हा रिपोर्ट.

कोल्हापुरात कधी कवा काय घडलं सांगता येत नाय. कुस्ती पासनं तांबडा पांढरा अन् तांबड्या पांढऱ्यापासनं पायताना पर्यंत सगळंच एक नंबर असतंय. कोल्हापुरचं पायतान म्हणजी कोल्हापुरी चप्पल या चप्पलीनं विटरनॅशनली दणका उडवलाय. कोल्हापुरच्या एका पठ्ठ्यानं साधसुधं नाय तर चांदीचं पायतान बनवलंय. ती बी ग्राम तोळ्यात नाय तर किलोत बनवलीय. दीड किलोचं पायतान वाघानं बनिवलयं. कोल्हापुरात सगळच वजनात असतंय. मापून ठेवायची भानगड नाय.

सांगलीतल्या एका व्यापाऱ्यानं युरोपात असलेल्या जावायाला पायतान पाठवायचं ठरलं. पण ही पायतान वेगळं असलं पाहिजे अस सासऱ्याला वाटत होतं. सोन्यासारख्या लेकीला सांभाळणाऱ्या जावायाच्या पायात शंभर नंबरी चांदीचं पायतान दियाचं ठरलं अन् गाठलं कोल्हापूर. कोल्हापूरच्या प्रदीप माळीनं बी हाय गय केली नाय अन् बनिवली जबरा चांदीचं पायतान एकदम टेक्सास. खरंतर जावायची झाली चांदी.. सोन्यासारखी बायकू मिळाली त्या चांदीचं पायतान घटना वर्षाभरापूर्वीची असती तरी असली सासरा सगळ्या जावायांना मिळो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com