Kakdiche Sandwich: झटपट आणि हेल्दी नाश्ता हवाय? मग हे काकडीचं सॅंडविच ठरेल बेस्ट

Sakshi Sunil Jadhav

हेल्दी रेसिपी

तुम्हाला झटपट आणि काही हेल्दी खायचं असेल तर सॅंडविच हा नाश्ता, टिफिन किंवा संध्याकाळी स्नॅक्ससाठी बेस्ट पर्याय ठरतो.

Corn Sandwich | GOOGLE

साहित्य

ब्रेड स्लाइस, काकडी, बटर, हिरवी चटणी, चीज स्लाइस, काळी मिरी पावडर, मीठ, टोमॅटो स्लाइस, कांदा स्लाइस, चाट मसाला इ.

Avocado Sandwich | yandex

भाज्या तयार करा

सर्वप्रथम काकडी, टोमॅटो आणि कांदा स्वच्छ धुवून बारीक स्लाइसमध्ये कापा. ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसवर समान प्रमाणात बटर लावा.

Avocado Sandwich

हिरवी चटणी पसरवा

बटर लावल्यानंतर त्यावर हिरवी चटणी व्यवस्थित पसरवा.

काकडीचे स्लाइस ठेवा

एका ब्रेड स्लाइसवर काकडीचे स्लाइस नीट लावा.

Cheese Sandwich Ingredients

टोमॅटो आणि कांदा जोडा

त्यावर टोमॅटो आणि कांद्याचे स्लाइस ठेवा. चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला भुरभुरा.

Bombay Masala Sandwich Recipe | yandex

चीज स्लाइस ठेवा

आवडत असल्यास चीज स्लाइस ठेवून सॅंडविच अधिक चविष्ट बनवा.

sandwich | freepik

सॅंडविच बंद करा

दुसरी ब्रेड स्लाइस वरून ठेवून हलक्या हाताने दाबा.

Veg Sandwich | Yandex

सर्व्ह करा

सॅंडविच त्रिकोणी किंवा चौकोनी आकारात कापून टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत ताजं सर्व्ह करा.

Toast the Sandwich | pinterest

NEXT: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

green hill station Maharashtra
येथे क्लिक करा