Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

Sakshi Sunil Jadhav

धकाधकीची जीवनशैली

मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून आणि गरमीपासून लांब काही क्षण शांततेत घालवायचे असतील तर माथेरान हा बेस्ट पर्याय ठरू शकतो.

Matheran hill station

एकूण अंतर

मुंबईपासून अंदाजे ८० ते ९० किमी अंतरावर असलेलं माथेरान हे लोकप्रिय हिल स्टेशन आहे. वीकेंड ट्रिपसाठी मोठ्या संख्येने पर्यटक इथे येत असतात.

places near Mumbai

वाहनमुक्त हिल स्टेशन

माथेरान हे आशियातील वाहनमुक्त हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे इथलं वातावरण शांत आणि स्वच्छ राहते.

cool places near Mumbai

पावसाळ्यातले सौंदर्य

पावसाळ्यात ईथे दाट धुकं, धबधबे आणि हिरवाईचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं. त्यामुळे पर्यटकांना महाबळेश्वरसारखा फील मिळतो.

cool places near Mumbai

टॉय ट्रेनचा आनंद

माथेरानची टॉय ट्रेन पर्यटकांसाठी मोठं आकर्षण ठरू शकते. डोंगरातून जाणारा हा प्रवास निसर्गरम्य अनुभव देतो.

Matheran weather

जवळील प्रसिद्ध ठिकाण

चार्लोट लेक हे माथेरानमधलं प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. सकाळी आणि संध्याकाळी ईथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

Matheran weather

प्रसिद्ध पॉइंट्स

माथेरानमध्ये ३० पेक्षा जास्त पॉइंट्स आहेत. पॅनोरमा पॉइंट, इको पॉइंट आणि लुईसा पॉइंट हे तिथे जास्त प्रसिद्ध आहेत.

green hill station Maharashtra

ट्रेकिंगचा अनुभव

ट्रेकिंग आणि घोडेस्वारीसाठी हे ठिकाण पर्यटकांमध्ये फेमस आहे. साहसी पर्यटक इथे मोठ्या संख्येने येतात.

green hill station Maharashtra

प्रवासाचा मार्ग

मुंबई आणि पुण्याहून रेल्वे व रस्तेमार्गाने माथेरानला सहज पोहोचता येतं. कमी खर्चात सुंदर निसर्ग अनुभवण्यासाठी हे बेस्ट डेस्टिनेशन आहे.

green hill station Maharashtra

NEXT: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

stuffed gilki recipe
येथे क्लिक करा