Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Sakshi Sunil Jadhav

गिलक्याची भाजी

साधी गिलकी ची भाजी अनेकांना आवडत नाही. पण मसालेदार भरली गिलकीची ही रेसिपी सध्या गृहिणींमध्ये खूप लोकप्रिय ठरत आहे.

Bharli Gilki Recipe

भाजीचे लागणारे साहित्य

गिलकी, शेंगदाणे, जिरे, धने, लसुन, गरम मसाला, काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि कोथिंबीर इ.

spicy ridge gourd recipe

गिलकी बनवण्याची कृती

सर्वप्रथम गिलकी आधी स्वच्छ धुवा त्यावरील साल काढून घ्या त्यानंतर मध्ये चीर देऊन आतील गर हलक्या हाताने काढून घ्या

stuffed gilki recipe

गिलकी बनवण्यासाठी लागणारा मसाला

मिक्सरमध्ये शेंगदाणे,जिरे,धने आणि लसूण टाकून जाडसर मसाला तयार करा. यामध्ये गरम मसाला,धने पावडर आणि काळा मसाला मिक्स करा.

stuffed gilki recipe

फोडणी द्या

तयार मिश्रणात मीठ,हळद,लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मसाला एकजीव करून घ्या.

stuffed gilki recipe

गिलकीमध्ये मसाला भरा

तयार मसाला गिलक्याची आत व्यवस्थित भरून घ्या. त्यामुळे प्रत्येक घासाला मसालेदार चव मिळेल.

stuffed gilki recipe

फोडणी कशी द्याल

एकीकडे तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे तडतडू द्या. त्यानंतर भरलेली गिलकी हलक्या हाताने परतून घ्या.

stuffed gilki recipe

स्पेशल टिप्स

आता झाकण ठेवून मंद आचेवर शिजवू द्या त्यामुळे मसाला आतपर्यंत मुरतो आणि भाजी अधिक स्वादिष्ट लागते.

stuffed gilki recipe

गिलक्याची भाजी कशा सोबत खावी

गरम भाकरी सोबत गिलकीची भाजी अगदी भन्नाट लागते वरून कोथिंबीर घालून सजवा आणि गरम भाकरी किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा ही भरलेली गिलकी घरातील सगळ्यांनाच नक्की आवडेल.

Stuffed Green Chilli Recipe | yandex

NEXT: तु तर मोरनी..., गौतमी पाटीलचा साडीतला नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल

Marathi folk songs
येथे क्लिक करा