Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : लग्नात चौघांकडून मारहाण; अपमानामुळे तरुणाने संपविले जीवन

Jalgaon News : भूषण हा आई- वडील व लहान भावासोबत भोलाणे येथे वास्तव्यास होता. १७ फेब्रुवारीला गावात लग्न असल्याने भूषण हा त्या लग्न सोहळ्यात होता.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : लग्न सोहळ्यात एका तरुणाला चौघांनी मारहाण केल्याचा प्रकार भोलाणे गावात घडला होता. या मारहाणीच्या (Jalgaon) घटनेनंतर अपमान सहन न झालेल्या तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार १८ फेब्रुवारीला सकाळी उघडकीस आला. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

भोलाणे (ता. जळगाव) येथील भूषण लक्ष्मण कोळी (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. भूषण हा आई- वडील व लहान भावासोबत भोलाणे येथे वास्तव्यास होता. १७ फेब्रुवारीला गावात लग्न असल्याने भूषण हा त्या लग्न (Marriage) सोहळ्यात होता. दरम्यान मध्यरात्रीनंतर गावातील तरूणांसोबत त्याचा वाद झाला. या वादात गावातील स्वप्‍नील गोकूळ कोळी, गोविंदा जगन कोळी, कृष्णा ऊर्फ अरुण कोळी आणि किरण गणेश कोळी या चौघांनी त्याला मारहाण केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही चुकले नसतांना सर्वांसमक्ष झालेल्या मारहाणीच्या अपमानातून भूषणने गळफास घेत आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबीयांची तक्रार आहे. भूषणचे काका जनार्दन श्यामराव कोळी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले दिवस उजाडल्यावरही भूषण बाहेर कसा येत नाही. म्हणून कुटुंबीयांनी पाहिले असता, तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. जळगाव (Police) पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT